
घरातील स्वयंपाकातील वेळ वाचवून तुम्हालाही काही तरी करावे असे वाटतंय ना! अहो, अगदी तुमच्याप्रमाणे १० पैकी सहा महिलांना देखील हेच वाटतंय बरं का! जवळपास ४० ते ४५ वर्षे वयोगटातील जवळपास ६१ टक्के महिलांचा बहुतांश वेळ हा घरकाम आणि त्यातही विशेषतः स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेणे यात जातो.
पुणे - घरातील स्वयंपाकातील वेळ वाचवून तुम्हालाही काही तरी करावे असे वाटतंय ना! अहो, अगदी तुमच्याप्रमाणे १० पैकी सहा महिलांना देखील हेच वाटतंय बरं का! जवळपास ४० ते ४५ वर्षे वयोगटातील जवळपास ६१ टक्के महिलांचा बहुतांश वेळ हा घरकाम आणि त्यातही विशेषतः स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेणे यात जातो. घरकामात पुरुषांचा हातभार लागावा आणि शिल्लक राहणारा वेळ आपल्या आवडीनिवडींच्या कामासाठी वापरणे शक्य होईल, असे जवळपास ९४ टक्के महिलांना वाटत असल्याचे समोर आले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यातील १० शहरांमध्ये डिसेंबर २०२०मध्ये केलेल्या सर्वेक्षणात बाराशे प्रतिसादकर्त्यांनी मते नोंदविली आहेत. यात पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांतील महिलांचा समावेश आहे. गृहिणींच्या आयुष्यावर घरगुती कामांचा कसा परिणाम होतो? आणि त्यांच्या आवडी जोपासण्यासाठी त्यांना पाठिंब्याची कशी गरज आहे?, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.
Serum Institute Fire:सीरमच्या आगीनंतर संभाजी ब्रिगेडचं पत्रक; 5 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
‘जेमिनी कुकिंग ऑइल’च्या या सर्वेक्षणानुसार ६० टक्क्यांहून अधिक महिलांना फक्त गृहिणी न राहता त्यापलीकडे काहीतरी करायचं आहे. पुरुषांनी घरातील कामांमध्ये अधिक लक्ष द्यायला हवे, असे पुण्यातील ९४ टक्के महिलांना वाटते.
कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण हे सर्वांत महत्त्वाचे आहे, यावर महिलांचा ठाम विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सर्वेक्षणातील ६५ टक्के महिलांना वाटते की, त्यांनी बनवलेले अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. मात्र, आपल्या महत्त्वाकांक्षा जोपासण्यासाठी त्यांना घरगुती कामांमध्ये जाणारा वेळ कमी करायचा आहे, असे राज्यातील ६० टक्के महिलांनी सांगितले.
Serum Institute Fire: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
नाशिक, सोलापूर आणि पुणे ही तीन शहरे यात आघाडीवर आहेत. या शहरातील महिलांना रोजच्या घरगुती कामांतून ३० मिनिटे जरी अधिक मिळाली तरी स्वतः:ची आवड जपण्यासाठी त्या उत्सुक आहेत, असे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्ष
Edited By - Prashant Patil