Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Pune ZP And Panchayat Election Result : पुण्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. हाती आलेल्या पहिल्या कलांनुसार मावळ, पुरंदर, बारामतीत पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतलीय.
Pune ZP Election Result

Pune ZP And Panchayat Election Result

Esakal

Updated on

Pune ZP Election Result: पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुतांश ठिकाणी आघाडी मिळवली आहे. पुरंदरमध्ये दिवे गराटे गटातून बापूसाहेब पठारे यांची मुलगी रूपाली झेंडे विजयी झाल्या आहेत. तर बारामती पंचायत समितीत अजित पवार गटाचे १० उमेदवार आघाडीवर आहेत. मावळ पंचायत समितीतसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस १० पैकी ९ जागी आघाडीवर असल्याची माहिती समोर येतेय. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुमताचा आकडा ओलांडला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ४६ उमेदवार आघाडीवर असल्याचं समोर आलंय. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढवली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Nirmala Nawale NCP appointment
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
New executive committee of Pune District Taluka Panchayat Samiti Chairperson Association announced with Kailas Kale as President
Marathi News Esakal
www.esakal.com