पुणेकरांनो अफवांवर विश्वास ठेऊ नका; परिस्थिती जाणून घेण्यासाठी 'हे' वाचा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पुणेकरांनो अफवांवर विश्वास ठेऊ नका; खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी 'हे' वाचा...

पुणे : सलग दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने कालपसून पुणे शहरात पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे नदीच्या पात्रात पाणी वाढत असतांना दुसरीकडे सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले आहे.

बंडगार्डन बंधाऱ्याला तडे गेले. खडकवासला धरण फुटण्याच्या मार्गावर आहे. खडकवासला धरणातून एक लाख अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावर पसरविण्यात आली आहे. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. खडकवासला धरणासह जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर बंडगार्डन बंधारा देखील सुरक्षित आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. सरकारी यंत्रणेशी संबंधित माहितीवर विश्वास ठेवा. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभाग येथील अधिकारी पांडुरंग शेलार यांनी दिली. 

खडकवासला धरणातून रविवारी संध्याकाळी पाच वाजता 45 हजार 474 क्यूसेक विसर्ग सुरू झाल्यानंतर तो सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत सलग 30 तास कायम ठेवला होता. सलग 30 तास विसर्ग कायम ठेवल्याने धरणातून पाच टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी शहराला साडेतीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा सोडला आहे. किंवा शेतीचे एक आवर्तन पूर्ण होऊन एक टीएमसी पाणी उरेल एवढे पाणी नदीत सोडले आहे. 

सोमवारी दिवसभरात खडकवासला येथे 22, पानशेत 39, वरसगाव येथे 53  व टेमघर येथे 80 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे खडकवासला पानशेत व वरसगाव धरणे शंभर टक्के भरली आहेत. टेमघर धरणात 98.99 टक्के म्हणजे 3.71 टीएमसी पाणीसाठा जमा झाला. खडकवासला बरोबरच पानशेत मधून नऊ हजार 892 वरसगाव मधून आठ 535 व टेमघर धरणातून सहाशे क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. हा विसर्ग खडकवासला धरणात जमा होत आहे. चारी धरणात मिळून 29.08 टीएमसी म्हणजे 99.77पाणीसाठा जमा झालेला आहे. मागील वर्षीपेक्षा हा सुमारे चार टीएमसीने पेक्षा जास्त आहे.

पूरस्थितीबद्दल पुणेकरांनी अफवांबाबत‌ सजग रहावे. पुण्यातील कोणत्याही माहितीची सत्यता पडताळण्यासाठी ‍www.esakal.com पाहा‌. 'सकाळ' चे मोबाईल अॅपही डाऊनलोड करा. दिवसभरात‌ पुल, धरणे, बंधाऱयाबाबत काही अफवा‌ पसरविण्याचा प्रयत्न झाला.‌ त्या रोखण्यासाठी 'सकाळ'ने सातत्याने ताज्या घडामोडी देत नागरीकांना नेमकी माहिती दिली.‌अफवा पसरवून आधीच कामाच्या तणावाखाली असलेल्या प्रशासनावरील‌ ताण आणखी‌ वाढवू नये, असे आवाहन आम्ही पुणेकरांना करीत आहोत. सोबत सत्यता तपासण्यासाठी काही बातम्यांच्या लिंक देत आहोत त्या पाहाव्यात.

पुणे : अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे शाळा कॉलेजला मंगळवारी सुट्टी

पुण्यातील पुलांवर पाणी कायम; कोंडी 'जैसे थे'!

पुणे- पिंपरी चिंचवड वाहतूक औंधमार्गे सुरू; मुळेचा पुर थोडा ओसरला​

टेमघर धरण 100 टक्के भरले; विसर्ग सुरू

#PuneFlood पाच हजार जणांचे स्थलांतर​

#PuneFlood ‘आयटी’ कर्मचाऱ्यांचे घरूनच काम​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars dont believe in rumors