पुणेकरांनी अनुभवला संगीत नाटकांचा सुवर्णकाळ

बालगंधर्व रंगमंदिर : शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आणि संगीत द्रौपदी नाटकाची शताब्दी सांगता कार्यक्रमात नाट्यसंगीत सादर करताना अस्मिता चिंचाळकर.
बालगंधर्व रंगमंदिर : शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आणि संगीत द्रौपदी नाटकाची शताब्दी सांगता कार्यक्रमात नाट्यसंगीत सादर करताना अस्मिता चिंचाळकर.

पुणे - द्रौपदी नाटकातील स्वगत, बालगंधर्व यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे निवडक प्रसंग आणि ‘खरा तो प्रेमा...’, ‘सूर सुख खली सु-विमला’, ‘स्वकुल तारक सुता’, ‘सोडी नच मजवरी’, ‘अशी नटे ही चारूता’ या लोकप्रिय नाट्यगीतांची पर्वणी अन्‌ संगीत नाटकाचा सुवर्णकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवला.

संगीत द्रौपदी नाटकाच्या शताब्दी वर्ष सांगतेनिमित्त द्रौपदी आणि बालगंधर्व या अनोख्या कार्यक्रमाचे. संवाद पुणे आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बालगंधर्व रसिक मंडळाच्या सहकार्याने आज (दि. १२ डिसेंबर) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, गणपतराव बालवडकर, डॉ. सागर बालवडकर, ज्येष्ठ सारंगीवादक फय्याज हुसेन खाँ, गझल गायक अन्वर कुरेशी, भाऊसाहेब भोईर, विजय कोलते, बापूसाहेब मुरकुटे, सुनील महाजन, बालगंधर्व रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, निकिता मोघे उपस्थित होते. अस्मिता चिंचाळकर यांनी द्रौपदी नाटकातील दोन पदे सादर केली. नाट्यगीतांचे सादरीकरण गायिका बकुळ पंडित, साखवळकर, रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व कादरबक्ष खाँ साहेब यांची संगीत नाट्य रंगभूमीवरील परंपरा पुढे चालविणाऱ्या अनुराधा राजहंस, ज्योत्स्ना बडवे, रूपा वाबळे, राहुल गोळे, दीपक टेंबे, खाँ साहेब फय्याज हुसेन खाँ व अन्वर कुरेशी यांचा सत्कार पंडित तळवलकर यांच्या हस्ते झाला. तळवलकर म्हणाले, ‘‘रत्नागिरीजवळील छोट्याशा गावात बालपणी नटसम्राट बालगंधर्व यांच्यासमोर मला तबला वादनाची मिळालेली संधी आजही स्मरणात आहे. नाट्यसंगीतामुळेच शास्त्रीय संगीताला वैभवाचे दिवस दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.

बालगंधर्व आमचे दैवत. ते द्रौपदीची भूमिका साकारत असताना प्रत्यक्ष द्रौपदीच गात आहे की काय, असा भास होत असे. सारंगीवादन आणि बालगंधर्वांचे गायन इतके एकरूप असे, की सारंगी वाजत आहे की बालगंधर्व गात आहेत, याचा श्रोत्यांना उलगडा होत नसे. बालगंधर्व हे त्यांच्या काळातील सुपरस्टारच होते.
- फय्याज हुसेन खाँ, ज्येष्ठ सारंगीवादक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com