

Dilip Walse Patil
Sakal
मंचर: “पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या रेकॉर्डवरील मूळ आराखड्यानुसार (डीपीआर)राबविण्यात यावा, हा प्रकल्प झाल्यास पुणे–नाशिक अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होईल. खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळून शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्याना विनंती केली जाईल. प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तरीही प्रकल्प मार्गी न लागल्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व मी रस्त्यावर उतरून जनतेसोबत आंदोलनाचे नेतृत्व करू” असा इशारा राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.