#PuneRains : स्वामी चिंचोली येथे पुराच्या वेढयातून आरोग्य कर्मचाऱ्यांची १५ तासानंतर सुटका

प्रा. प्रशांत चवरे
Thursday, 15 October 2020

आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचारी व दोन कुत्र्यांची पिल्ले १५ तास पाण्याच्या वेढ्यात अडकुन पडली होती. अखेर मुळशी आपत्ती व्यवस्थान समितीच्या रेस्कु टिमने गुरुवारी(ता.१५) दुपारी एकच्या सुमारास त्यांची यशस्वी सुटका केली.

भिगवण : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे बुधवारी (ता.१४) झालेल्या मुसळधार पावसांमुळे ओढयावरील पुल वाहुन गेल्यामळे गावाचा संपर्क तुटला तर ओढयाला आलेल्या पुराने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास वेढा टाकला. आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचारी व दोन कुत्र्यांची पिल्ले १५ तास पाण्याच्या वेढ्यात अडकुन पडली होती. अखेर मुळशी आपत्ती व्यवस्थान समितीच्या रेस्कु टिमने गुरुवारी(ता.१५) दुपारी एकच्या सुमारास त्यांची यशस्वी सुटका केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा अनेकांना फटका बसला आहे. काही ठिकाणी व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहुन गेल्या तर कुठे घरांना व शासकिय इमारतींनाही पुराचा वेढा पडला. स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील ओढयास बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पुर आला पुराने काही वेळातच गावास संपर्क करणाऱ्या पुलाला तडाखा दिला. पुरामध्ये पुल वाहुन गेला तर ओढयाच्या शेजारी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास पुराच्या पाण्याने वेढा टाकला. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य कर्मचारी मयुरी ननवरे, ननवरे, सुनंदा भोसले व दोन पाळीव कुत्रे अडकुन पडली.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

पुराचा वेढा पडल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच गजानन गुणवरे,चंद्रकांत होले, रामराजे शिंदे, वसिम शेख व ग्रामस्थांनी याबाबत तहसिलदार संजय पाटील, दौंडचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, ग्रामसेवक चंद्रकांत देवकांबळे व प्रशासनास याबाबत कल्पना दिली. दरम्यान ग्रामस्थांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दुरध्वनीद्वारे देऊन व मानसिक आधार दिला. गुरुवारी(ता.१५) दुपारी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे रेस्कू टिम स्वामी चिंचोली येथे दाखल झाली व अथक प्रयत्नांतुन पुराच्या वेढयामध्ये अडकलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. रेस्कु टिमचा आरोग्य कर्मचाऱ्याची सुटका करतानाचा थरार ग्रामस्थांनी अनुभवला.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

याबाबत स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच गजानन गुणवरे म्हणाले, स्वामी चिंचोली ओढयाला पुर आल्यामुळे पुराच्या वेढयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी अडकले होते. गावातील प्रमुख मंडळी व प्रशासकिय अधिकारी यांच्या प्रयत्नांतुन आरोग्य कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यासाठी प्रशासन व मुळशी रेस्कु टिम यांनी विशेष सहकार्य केले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #PuneRains : Health workers rescued from flood siege at Swami Chincholi after 15 hours