स्वच्छतेत पुण्याचे नामांकन घटले, देशात नववा क्रमांक

देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून नामांकन मिळावे यासाठी इंदूरशी स्पर्धा करणाऱ्या पुणे महापालिकेला २०२२ च्या स्वच्छ सर्वेक्षणात झटका बसला आहे.
Pune City Cleaning
Pune City CleaningSakal
Summary

देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून नामांकन मिळावे यासाठी इंदूरशी स्पर्धा करणाऱ्या पुणे महापालिकेला २०२२ च्या स्वच्छ सर्वेक्षणात झटका बसला आहे.

पुणे - देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून नामांकन मिळावे यासाठी इंदूरशी स्पर्धा करणाऱ्या पुणे महापालिकेला २०२२ च्या स्वच्छ सर्वेक्षणात झटका बसला आहे. नामांकन वाढण्या ऐवजी पाच क्रमांकावरून थेट नवव्या क्रमांकावर पुणे गेले आहे. कचरा मुक्तीमध्ये थ्री स्टार शहर हे नामांकन गतवर्षीप्रमाणे कायम राहिले आहे. तर राज्यात पुण्याचा दुसरा क्रमांक कायम आहे.

केंद्र सरकारतर्फे देश पातळीवर दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्थिती, घरोघरी संकलित होणारा कचरा व वस्ती पातळीवर कचऱ्याचे नियोजन, कचऱ्यावरील प्रक्रिया याची प्रत्यक्ष केली जाणारी पाहणी, नागरिकांचा सहभाग, केंद्र शासनाकडून फोनद्वारे नागरिकांकडून घेतला जाणारा अभिप्राय यासह अनेक निकषांचा विचार या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केला जातो. एप्रिल- मे महिन्यात पुणे शहरात केंद्र सरकराच्या पथकाने येऊन पाहणी केली होती. त्यानंतर केंद्राने आज या स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. त्यामध्ये पुण्याचे नामांकन घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४५ शहरांमध्ये पुणे महापालिकेचा पहिल्या दहा मध्ये नववा क्रमांक आलेला आहे. ओडीएफ फ्री शहरांच्या प्लस प्लस हा दर्जा मिळालेला आहे. तर स्वच्छतेला थ्रीस्टार रॅकिंग मिळालेले आहे. तर या स्पर्धेत यंदाही मध्यप्रदेशातल इंदूर महापालिकेने पुन्हा एकदा देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

दरम्यान, पुण्‍याची वाढलेली हद्द व फाइव्ह स्टार रॅकिंग मानांकनासाठी जाहीर केलेल्या निकषात महापालिकेच्या गुणांमध्ये वाढ होऊ शकली नसल्याने थ्री स्टार सिटी या नामांकनावर समाधान मानावे लागले आहे. नवी मुंबई शहराचा महाराष्ट्रात पहिला व देशात तिसरा क्रमांक आला आहे. त्यानंतर राज्यात पुणे शहर हे स्वच्छतेमध्ये दोन क्रमांकावर आलेले आहे.

कोरोनाच्या काळातही महापालिकेने शहर स्वच्छतेमध्ये तडजोड केली नव्हती. कोरोनानंतर झालेल्या स्पर्धेत २०२० ला पुण्याचा १५ वे नामांकन मिळाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये थेट पाचव्या क्रमांकवर छेप घेतली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी यात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना देशात नववा क्रमांक आला आहे. दरम्यान, महापालिकेला शहर स्वच्छतेच्या सर्व घटकांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. नागरिकांशी दूरध्वनीवर संपर्क करून त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या अभिप्रायामध्ये कमी गुण मिळाले आहेत, त्याचाच फटका बसला असण्याची शक्यता काही अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

‘पुणे शहराचे स्वच्छतेमध्ये नामांकन वाढविण्यासाठी आम्ही गेले वर्षभर अनेक प्रयत्न केले. यंदा देशात नववा व राज्यात दुसरा क्रमांक आलेले असला तरी पुढच्या वर्षी यामध्ये सुधारणा करण्यासाठी मेहनत करू.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com