पुरंदरच्या सीताफळाचा हंगाम दिड महिना अगोदरच गुंडाळला जातोय ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Purandar custard apple season is wrapped up a month and a half in advance

- सततच्या पावसाने व तापमान वाढीने एकाच वेळी माल पक्व झाल्याचा परिणाम

- यंदा हंगामात 50 टक्के नुकसान अन् 40 कोटींचा तोटा

पुरंदरच्या सीताफळाचा हंगाम दिड महिना अगोदरच गुंडाळला जातोय !

सासवड ः देशभरात प्रसिध्द असलेल्या पुरंदरच्या सीताफळ आगारातील यंदाचा हंगाम जवळपास दिड महिना आधीच गुंडळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱया पावसाने बागेतील पाण्याचा नीट निचरा न होण्याने आणि अतिवृष्टीनेही अधिक झोडपल्याने, तसेच बुरशी वाढल्याने फळ काळे पडले. शिवाय पावसाच्या उघडीपीनंतर आॅक्टोबर हिटचा तडाखा बसून माल एकदम पक्व झाला. लाॅकडाऊनने पहील्या घासाला खडा लागला तर, पाठोपाठच्या या साऱया संकटांनी यंदा पुरंदर तालुक्यात सीताफळाचे नुकसान 50 टक्के नुकसान झाले.

तालुक्याच्या 60 टक्के गावांत साधारणतः चार हजार हेक्टरवर सीताफळ बागा आहेत. इतर गावांतही तुरळक बागा आहेत. आगाप व उन्हाळी बहराचा हंगाम जूनपासून सुरु होतो. नंतर पावसाळी हंगाम व नंतर छाटणी करुन फुट व कळी घेऊन त्याही हंगामाची फळतोडणी डिसेंबरअखेरपर्यंत चालते. हेक्टरी किमान दोन लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळते. यंदा 4,000 हेक्टरमधील फळपिकात निम्म्याने घट होऊन तालुक्यात सीताफळाचा हा हंगाम 80 कोटींपर्यंत न पोचता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कसाबसा 40 कोटी रुपयांचे चलन मिळवित. दिड महिना अगोदर आताच गुंडाळला गेल्याचे चित्र आहे. ''क्रेटमागे (18 ते 20 किलो) किमान हजार व अधिकाधिक दोन - अडीच हजार भाव असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटाने लाॅकडाऊन काळातच थंड फळ म्हणून उठाव घटला. 200 ते 500 रुपये क्रेटमागे मिळत होते. पावसाने तोडे कमी झाले की, भाव 800 ते 1000 वर जायचे. पण जेंव्हा हिटने माल ओढून आला त्यावेळी पुन्हा भावात चढउतार राहिली.

आता भाव क्रेटमागे 1200 ते 1500 आहे, पण मागणी असूनही कित्येकांचा हंगामच संपल्यात जमा आहे. सासवडच्या घाऊक बाजारात जिथे दोन ते अडीच हजार क्रेट माल यायचा तिथे आज फक्त 20 ते 25 क्रेट कसेबसे येतायेत. थोडे दिवसांनी तेही येणार नाहीत.'' असे उत्पादकांनी व व्यापाऱयांनी सांगितले.   

कोण घालणार आवर, समाजमंदिरावर टॉवर! भाड्यापोटी येणारे शुल्क नगरसेविकेच्या पतीच्या खिशात

हंगाम का संपला लवकर ?

- सीताफळ कोरडवाहू फळपिक असतानाही सततचा पाऊस यंदा अधिक
- अतिवृष्टीचा अनेकदा मार बसला, बागेतील पाण्याचा अपेक्षित निचरा झाला नाही 
- दमट हवा, स्वच्छ सुर्यप्रकाशाची कमतरता, खेळती हवा कमी, तणवाढ, बुरशीचा अॅटक
- परतीच्या पावसाच्या व नंतरच्या काळात तापमान वाढीने लहान मोठी फळे पिकून येण्याचे प्रमाण वाढले
-सर्वच शेतकऱयांचा माल तोडणीला एकाच वेळी आला व बाजारभावही पडते राहील
- अगोदरच फळे निघून गेल्याने हंगामात बाजारपेठेत अपेक्षित मालाच्या 10 टक्केच आवक आता
- अजून दहा - बारा दिवसांनी तर जो थोडा माल येतो, तोही बंद होऊन हंगाम पुरता संपेल असे चित्र 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लाॅकडाऊनची घरघर.. नंतर संकटांची भर

''पुरंदरमध्ये सीताफळात बहुतेक स्थानिक वाण चालतो. अधिक तापदायक मिलीबग यंदाही झाला, मात्र पावसाने तो बऱयापैकी धुवून गेला. मात्र बिघडलेल्या वातावरणाने बुरशीचा प्रादुर्भाव होऊन दांड्याकडे फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढले. त्यातून अधिक काळी फळे फेकून द्यावी लागली. तर थोड्या काळेपणाने फळाचे बाजारमुल्यही घटले.  गोल्डन वाण काही शेतकऱयांनी मागे लावला, त्यात साधारणतः फळमाशीने अॅटक केला व रोगकिड वाढून फळ पिकल्यावर आळी निघण्याचे प्रमाण वाढले. एकुणच सीताफळाला लाॅकडाऊनने अगोदर वाहतुक व विक्री साखळी खंडीत केली होती. तर नंतर विविध संकटांनी गाठले. त्यातून हंगाम निम्म्यापेक्षा अधिक तोट्यात गेला. सीताफळाची प्रक्रीयाही (गर काढणी) अपेक्षित झाली नाही,'' असे उत्पादक शेतकरी भाऊसाहेब खेडेकर, नितीन इंगळे, जितेंद्र कुंजीर, व्यापारी म्हस्कूशेठ खेडेकर, गिरीश काळे

महाराष्ट्रात 4 वर्षे विरोधात बसण्याची आमची तयारी पण सरकार चालेल का? 

''पुरंदरमध्ये काही शेतकरी पाण्याअभावी पावसावरच सीताफळ बहर धरतात. तर कित्येक शेतकरी आगाप किंवा उन्हाळी बहर धरुन पावसाळी हंगामाचीही फळे पदरात पाडून घेतात. आम्ही वर्षात सीताफळाचे `तीन हंगाम` घेण्याचे प्रयोग बारा वर्षे यशस्वी केले. पण यंदा परिस्थिती एवढी वाईट झाली की, एका हंगामावरच गप्प बसावे लागले. 22 लाखाचे उत्पन्न कसेबरे 11 लाखावर आले.''
- श्रीरंग व विलास कडलग, राजेवाडी, ता. पुरंदर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top