पुरंदरमधील या गावांचाही विमानतळाच्या विरोधाचा एकमुखी ठराव 

दत्ता जाधव
Monday, 31 August 2020

पुरंदर तालुक्यातील रिसे व पिसे येथील ग्रामस्थांनी काल रात्री विशेष बैठक घेऊन नियोजित विमानतळाच्या विरोधाचा एकमुखी ठराव केला. 

माळशिरस (पुणे) : पुरंदर तालुक्यातील रिसे व पिसे येथील ग्रामस्थांनी काल रात्री विशेष बैठक घेऊन नियोजित विमानतळाच्या विरोधाचा एकमुखी ठराव केला. 

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत आमदार संजय जगताप यांनी विमानतळासाठी सध्या निर्धारित झालेली जागा बदलून व रिसे, पिसे व पांडेश्वर परिसरातील जागा नव्याने सुचवली. पारगाव परिसरातील सात गावातील विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेच्या ठिकाणी ग्रामस्थांचा असणारा विरोध व तेथील बागायती क्षेत्र विचारात घेऊन नवीन  जागेच्या  सूचना आमदार संजय जगताप यांनी मांडल्याचे वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर रात्री रिसे व पिसे ग्रामस्थांनी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात विशेष मिटिंग घेतली. 

पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोचववला पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात

या बैठकीमध्ये उपस्थित सर्व ग्रामस्थांनी भूमिका मांडली की, गावात आता जनाई शिरसाई योजनेचे पाणी आले आहे. त्यामुळे शेतकरी फळबागा व बागायत करून स्थिरस्थावर होऊ लागला आहे. त्यामुळे विमानतळ होऊ नये. या वेळी सर्वच उपस्थित शेतकऱ्यांनी भूमिका मांडून कुठल्याही परिस्थितीमध्ये विमानतळासाठी जमीन न द्यायचा एकमुखी ठराव केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Purandar taluka Rise and Pise villagers oppose the airport