हॉटेलांची १० कोटींची बिलं थकली; डॉक्‍टरांच्या राहण्याची केली होती सोय

Hotels
Hotels

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात विलगीकरण कक्षात रूपांतरित केलेल्या आणि डॉक्‍टरांना राहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या हॉटेलांची बिले गेल्या तीन महिन्यांपासून थकली असल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत द हॉटेल अँड रेस्टोरेन्ट्‌स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) आणि द पूना हॉटेलियर्स असोसिएशन (पीएचए) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहे. एप्रिलपासून शहरातील सुमारे 25 हॉटेलचे विलगीकरण कक्षात रूपांतरित करण्यात आले आहे. त्यांची सुमारे 10 कोटी रुपयांची थकबाकी प्रशासनाकडे आहे.

पीएचएचे अध्यक्ष शरण शेट्टी यांनी याबाबत सांगितले की, हॉटेलांनी पुरवलेल्या सेवांचा योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता हॉटेल्सनी हा प्रस्ताव मान्य केला. त्यानुसार हॉटेल कर्मचाऱ्यांचे पगार, विजेची बिल, व्यवस्थापन आणि देखरेखीचा सर्व खर्च हॉटेल मालकांनी स्वतः उचलला. मात्र, अद्याप त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.

योग्य मोबदल्याचे आश्‍वासन देऊन आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्‍टरांच्या निवासासाठी म्हणून आम्हाला हॉटेल उघडण्यास भाग पाडले. मात्र आम्ही अजूनही त्या मोबदल्याच्या प्रतीक्षेतच आहोत. दुर्दैवाने आता आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी माहिती एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष गुरबक्षीश सिंग यांनी दिली.

चांगल्या हेतूने घेतलेल्या निर्णयाची अशी झळ बसावी हे दुर्दैवी आहे. सरकारी आदेशानुसार सर्व काही बंद असताना हॉटेल्स सगळ्या सोयींसह उघडावी लागली होती. कित्येक हॉटेल्स आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आमच्या मागणीकडे कोणीच लक्ष देत नाही.
- शरण शेट्टी, अध्यक्ष, पीएचए

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com