अखेर शिवप्रेमींचा विजय; संभाजी बिडीच्या नावात होणार बदल!

Sambhaji_Bidi
Sambhaji_Bidi

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवप्रेमींनी ऐरणीवर आणलेल्या संभाजी बिडीच्या मुद्यावर अखेर तोडगा निघाला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय उत्पादक साबळे वाघिरे आणि कंपनी. प्रा. लि. ने घेतला आहे. त्यामुळे लवकरच या बिडीला नवीन नाव दिले जाणार आहे.

शिवप्रेमी संघटना आणि नागरिकांच्या भावनेचा आदर ठेवून आम्ही बिडीचे नाव बदलण्याचे निश्‍चित केले आहे. परंतु नाव बदलण्यासाठी ते कायदेशीर रजिस्टर करावे लागणार आहे. त्यासाठी काही वेळ लागणार आहे, असे साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी गुरुवारी (ता.१०) स्पष्ट केले. याबाबत त्यांनी प्रसिद्धपत्रक काढले आहे. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या संभाजी महाराजांचे नाव एका बिडीला देण्यावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी हा विषय लावून धरला होता.

याबाबत पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलनही सुरू करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियातून याविषयी आवाज उठवला होता. तर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी थेट 'धूर काढण्याची' भाषा केली होती. त्यामुळे हा विषय आणखीनच तापला होता. या कंपनीवर 60 ते 70 हजार बिडी कामगाराचा प्रपंच अवलंबून आहे. कंपनी बंद पडली, तर त्यांचा रोजगार हिसकावला जाईल. त्यामुळे शिवप्रेमींनी यापूर्वीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी बिडीच्या पॅकेटवरून संभाजी महाराजांचा फोटो आणि छत्रपती हा उल्लेख काढण्याबाबत सूचना केली. त्यानुसार महाराजांचा फोटो आणि छत्रपती हा शब्द काढला आहे. बिडी व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे. त्यात नक्कल करणाऱ्यांमुळे व्यवसायाला मोठा फटका
बसतो आहे, असे साबळे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com