esakal | KBC मध्ये सुप्रिया सुळेंवर विचारला प्रश्न; लक्ष्मीने जिंकले साडेबारा लाख रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

KBC_Supriya_Sule

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसून खेळताना अत्यंत हुशारीने त्यांनी 25 लाखांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली होती, मात्र या प्रश्नाचे नेमके उत्तर त्यांना माहिती नसल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

KBC मध्ये सुप्रिया सुळेंवर विचारला प्रश्न; लक्ष्मीने जिंकले साडेबारा लाख रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : ज्ञानाची कवाड खुली झाली की लक्ष्मी देखील आपोआप त्या कवाडातून आनंदाने प्रवेश करते याचे उदाहरण समोर आले. सोनीवर होणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात गुरुवारी (ता.१९) उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत लक्ष्मी अंकुशराव कवडे यांनी तब्बल साडेबारा लाख रुपये जिंकले. 

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसून खेळताना अत्यंत हुशारीने त्यांनी 25 लाखांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली होती, मात्र या प्रश्नाचे नेमके उत्तर त्यांना माहिती नसल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना ज्ञान हे गरजेचे आहे, असे त्यांनी अमिताभ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितल्यावर स्वताः बच्चनही प्रभावित झाले. 

मास्कविना फिरणाऱ्यांनो, आता चौपट दंड होणार; दिल्लीची कोरोनाची स्थिती गंभीर!

या खेळात त्यांना सुप्रिया सुळे कोणत्या मतदारसंघातून खासदार झाल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्याचे त्यांनी बारामती हे उत्तर देत 12 लाख 50 हजारांचा टप्पा गाठला. लहानपणापासून जे शिक्षण घेतले आहे, जे कौशल्य प्राप्त केले त्याचा फायदा त्यांना आज कौन बनेग करोडपतीच्या खेळात झाला. अत्यंत धैर्य व हुशारीने त्यांनी 25 लाखांपर्यंत मजल मारली होती. या टप्प्यापर्यंत त्यांच्या चारही लाईफलाईन संपल्यामुळे आणि त्यांना या प्रश्नाचे नेमके उत्तर माहिती नसल्याने त्यांनी या खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या चौघांना अटक; आरोपींमध्ये दोन भावांचा समावेश​

साडेबारालाखांची रक्कम आपल्यासाठी मोठी असल्याने सांगत कौशल्याने जितकी रक्कम मिळवली ती सोबत घेऊनच लक्ष्मी बाहेर पडल्या. 
सर्वच क्षेत्रातील अत्यंत कठीण प्रश्न विचारताना अमिताभ बच्चन यांनी त्यांची परिक्षा पाहिली, लाईफलाईन वापरत अत्यंत हुशारीने त्यांनी हा खेळ खेळला व केवळ शहरवासियांचीच यात मक्तेदारी नाही हे सिध्द करुन दाखविले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)