Chitra Wagh
Chitra Waghटिम ई सकाळ

पुणे : चित्रा वाघ यांना रघुनाथ कुचीक यांची नोटीस 

वाघ यांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलीला न्याय मिळावा अशी मागणी करीत कुचिक यांच्यावर जोरदार हल्ला करणाऱ्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना कुचिक यांनी नोटीस बाजवली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी पाठवलेली ही नोटीस वाघ यांना आज सकाळी मिळाली आहे. "या गुन्ह्यात न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असून चित्रा वाघ या माझी बदनामी करीत आहे. त्यांनी माझ्या अब्रुनुकसानीची नुकसानीची भरपाई द्यावी. तसेच याबाबत आपण वाघ यांच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करणार आहोत," असे कुचिक यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे. ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

वाघ यांनी ट्वीट करून याबाबद माहिती दिली आहे. यामध्ये वाघ यांनी लिहिली आहे की, “आज सकाळीचं कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली. दुसरीकडे माझ्यावर कसा गुन्हा दाखल करता येईल यावर खलबतं सुरू आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग नाही का?” दरम्यान वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फोट या प्रकरणातील तरुणीने मंगळवारी (ता.12) केला. इतकेच नव्हे, तर आजपर्यंत सगळे जबाब वाघ यांच्या सांगण्यावरुनच दिल्याचेही तिने नमूद केले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ यांनी कुचिक यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्याविरुद्ध रान पेटविले होते. कुचिक यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यावरही वाघ यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यासाठी वाघ यांनी पुण्यातील भाजप कार्यालयामध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर कुचिक व संबंधीत तरुणीमध्ये झालेले मोबाईल चॅट पुढे आणून कुचिक यांच्यासह पुणे पोलिस व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. त्या सर्व पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती ऍड. निंबाळकर यांनी दिली. संबंधित तरुणी एकटी लढत होती, तिला न्याय मिळावा म्हणुन आम्ही पुढे आलो, तेव्हा कोणी पुढे आले नाही. पिडीत तरुणीने माझ्याविरुद्ध बोलल्यामुळे माझा आवाज बंद होईल, असे सरकारला वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. या सगळ्या प्रकरणाच्या सत्यतेसाठी मी तयार आहे.'' अशा शब्दात वाघ यांनी आपल्या भुमिकेचे मंगळवारी समर्थन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com