पुण्यात हॉटेलवर छापा; मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मांगडेवाडीतील घटना; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
पुण्यात हॉटेलवर छापा; मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कात्रज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात निर्बंध असतानादेखील सातारा रस्त्यांवरील मांगडेवाडी परिसरातील साई गार्डन हॉटेलमध्ये मद्यपान सुरु होते. यावेळी भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई करत ४१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २५ दुचाकी, एक रिक्षा, एक चारचाकी, ०७ लाख ०५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यांतील पोलिस अंमलदार विजय दुधाळ आणि शिंदे कात्रज परिसरात गस्तीवर असताना मांगडेवाडी परिसरातील साई गार्डन या हॉटेलसमोर दुचाकी लागलेल्या त्यांना आढळून आल्या. मात्र, हॉटेलचे शटर बंद होते. त्यामुळे आतमध्ये काहीतरी चालू असल्याचा त्यांचा संशय बळावला. त्यांनी शटर उघडले तर आतमध्ये काही लोक मद्यपान करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिस स्टेशनला कळविली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक गंगाधर घावटे यांनी कर्मचाऱ्यांसह हॉटेलवर छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.

पुण्यात हॉटेलवर छापा; मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
लोणी काळभोर : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिस अंमलदार दुधाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४१ जणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदरची कारवाई ही पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास हे पोलिस उपनिरिक्षक समाधान मचाले करत आहेत.

पुण्यात हॉटेलवर छापा; मद्यपान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
दिलासा! पुणे जिल्ह्यात नवे रुग्ण दीड हजारच्या आत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com