NEET Paper Leak Probe: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरची सीबीआयकडून कसून चौकशी; मनीषा मांढरेच्या घराची झडती

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरची सीबीआयकडून सखोल चौकशी; पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्या घरासह महाविद्यालयातील लॉकरवरही छापे
CBI Intensifies Probe into NEET Paper Leak Scandal

CBI Intensifies Probe into NEET Paper Leak Scandal

esakal

Updated on

पुणे : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) लातूरमधील एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरची कसून चौकशी करण्यात आली. तसेच, पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्या घरासह महाविद्यालयातील लॉकरची झडती घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात दररोज १० ते १५ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com