Pune Rain Update : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची बॅटिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Update

Pune Rain Update : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची बॅटिंग

Pune Rain Update : पुणे शहरासह परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पाऊस आला आहे. पुण्यात आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर दाट ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुण्यात औंध, पाषाण, सकाळनगर, सूसरस्ता, सुतारवाडी, सूस म्हाळुंगे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. तर वडगाव शेरी खराडी विमान नगर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. (Rain Update)

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले होते. त्यांना सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावताना दिसुन येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर दिसुन आला. तर आजही काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

टॅग्स :Pune Newsrain