
मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील बारा तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता प्रसिद्ध केलेल्या अंदाजात दिला आहे. पुण्यात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा; १२ तासांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस
पुणे : मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील बारा तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता प्रसिद्ध केलेल्या अंदाजात दिला आहे. पुण्यात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
इशान्य भारतात मुसळधार पाऊस
कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पुढे सरकला आहे. त्यामुळे उत्तरेसह ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याचे दिसते. गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. या वातावरणात गेल्या बारा तासांपासून बदल सुरू झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने टिपले आहे. रात्री आठ वाजल्यापासून पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नाशिक येथे पावसाच्या सरी पडत आहे. पुण्यात रात्री उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाच्या सरी पडत आहेत.
शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण
शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील १२ तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये १.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७.६ मिलीमीटर पाऊस पडल्याते शिवाजीनगर येथील वेधशाळेत नोंदले गेले. पुण्यात १ जूनपासून २४ जुलैपर्यंत २७२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दरम्यान शहरात २७०.२ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो.
मध्य महाराष्ट्र उपविभागत कोणते जिल्हे?
हवामान खत्याते देशात ३६ हवामान उपविभाग आहेत. त्यापैकी चार हवामान उपविभाग महाराष्ट्रात आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण-गोवा, असे हे उपविभाग आहे. त्यापैकी मध्य महाराष्ट्रात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे अशा जिल्ह्यांचा समावेश होतो.
Web Title: Rain Warning Thunderstorms Next 12 Hours Central Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..