पुणेकरांनो, पाहा धरणसाठ्यात किती वाढ झाली?

राजेंद्रकृष्ण कापसे
Tuesday, 4 August 2020

-धरण साखळी क्षेत्रात सुमारे एक टीएमसीची वाढ.
-सोमवारपेक्षा मंगळवारी पावसाचा जोर वाढला. 

खडकवासला : "शहरालगतच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सलग दोन दिवस पाऊस पडत आहे. परिणामी चारही धरणात मिळून सुमारे एक टीएमसीची वाढ झाली आहे." अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सकाळ'शी बोलताना दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धरण परिसरात सोमवारी सकाळपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. परंतु त्या दिवशी रात्री पावसाचा जोर वाढला सोमवारी संध्याकाळी पाच वाजता चार ही धरणात मिळून 9.82 टीएमसी पाणीसाठा होता. आज मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 10.66 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. म्हणजे ही वाढ0.84 टीएमसी(0.840दशलक्ष घनमीटर) झाली आहे. या तसेच 24 तासात शहराला अंदाजे 50 दशलक्ष घनमीटर पाणी सोडलेले असे मिळून 0.89 टीएमसी वाढ झालेली आहे. बुधवारी सकाळपर्यंत ही वाढ एक टीएमसी पेक्षा जास्त होईल. असे पाटील यांनी सांगितले.

मंगळवारी पावसाचा जोर डबल 
सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे 24 तासात जेवढा पाऊस पडला. त्यापेक्षा जास्त पाऊस मंगळवारी अकरा तासात पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणात अनुक्रमे 23, 41, 45 व 60 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी सहा ते मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे फक्त अकरा तासात खडकवासला येथे 21, पानशेत व वरसगाव 60 व टेमघर येथे 70 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

65 दिवसात टेमघरला 1110 मिमी पाऊस
धरण परिसरात एक जूनपासून 4 ऑगस्ट या 65 दिवसांत खडकवासला येथे 352, पानशेत येथे 793, वरसगाव येथे 758 तर टेमघर येथे 1110 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall intensified in the dam area