Vidhan Sabha 2019 : भाजप सेनेची रोज इज्जत काढत आहे : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

पुणे, नाशिकसारख्या शहरात शिवसेना कुठंच दिसत नाही. भाजपवाले सेनेची रोज इज्जत काढत आहेत. पण, हे सत्तेच लाचार आहेत. नुसते म्हणत होते इतकं वर्षे युतीत सडली, मग शिवसेना 124 वरच का अडली, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

पुणे : पुणे, नाशिकसारख्या शहरात शिवसेना कुठंच दिसत नाही. भाजपवाले सेनेची रोज इज्जत काढत आहेत. पण, हे सत्तेचे लाचार आहेत. नुसते म्हणत होते इतकं वर्षे युतीत सडली, मग शिवसेना 124 वरच का अडली, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

आज बाळासाहेब असते तर...- राज ठाकरे

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी मंडईत सभा घेतली. सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी होती. या सभेत राज ठाकरे यांना पहिली सभा पावसामुळे रद्द झाल्याची आठवण सांगितले.

कोल्हापुरातला मंत्री पुराने कोथरुडपर्यंत वाहत आला : राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, की आज बाळासाहेब असते तर कोणाची हिंमत झाली नसती. माझ्यासोबतही नसती झाली. भाजपवाले सेनेची रोज इज्जत काढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Criticise on Shiv Sena in pune