Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब असते तर, त्यांचं धाडस झालं नसतं : राज ठाकरे

टीम ई-सकाळ
Monday, 14 October 2019

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द झाली होती. आज, रात्री राज यांची पुण्यात पहिली जाहीर सभा झाली. पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. त्याचवेळी बाळासाहेब असते तर, भाजपचं हे धाडस झालं असतं. माझ्याबाबतही त्यांचं असं धाडस झालं नसतं, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलं. असं म्हणताना मात्र त्यांनी ईडीच्या चौकशीचा उल्लेख केला नाही.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात महात्मा फुले मंडईत जाहीर सभा झाली. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द झाली होती. आज, रात्री राज यांची पुण्यात पहिली जाहीर सभा झाली. पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. त्याचवेळी बाळासाहेब असते तर, भाजपचं हे धाडस झालं असतं. माझ्याबाबतही त्यांचं असं धाडस झालं नसतं, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलं. असं म्हणताना मात्र त्यांनी ईडीच्या चौकशीचा उल्लेख केला नाही.

आदित्य ठाकरे जिंकतील, पण हरवणार कोणाला?

महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोला
महाराष्ट्राच्या विधानसभेत सक्षम विरोधीपक्ष उभा करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन राज यांनी पुण्यातही केले. मुंबईतून सुरू केलेल्या जाहीर सभांमध्ये राज यांनी विरोधीपक्षासाठी मनसेला मतदान करा, अशी भूमिका घेतली आहे. पुण्यातही त्यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला. सध्या भाजपकडून काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा प्रचारात वापर केला जात आहे. याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, ‘मी कोत्या मनोवृत्तीचा नाही. काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर मी सरकारचे अभिनंदन केले होते. पण, महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्याचा काय संबंध? अमित शहा यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न यावर बोलावे.’

मंत्री कोल्हापुरातून पुण्यात पुराने वाहून आला : राज ठाकरे

संभाजी भिडे यांनी स्मृती इराणींना दिले रायगडला येण्याचे निमंत्रण

सरकारमधला मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, पुण्यात पहिली प्रचार सभा घेतली. यात सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना पुण्यात झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यात अनेकांच्या प्रापंचिक साहित्याचं नुकसान झाल्याचा उल्लेख केला. त्याचवेळी उपस्थितांमधून, 'चंपा' असा उल्लेख झाला. त्यावर 'पुणेकर नावं ठेवायला पटाईत आहेत', असं राज हसत हसत म्हणाले. राज यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पुढे बोलवून घेतले. 'हा आहे चंपाची चंपी करणारा,' अशी किशोर शिंदे यांची ओळख करून दिली. 'कोल्हापूर सांगलीत महापूर आला. नुकसान झालं. सरकारमधील एक मंत्री थेट वाहत इथपर्यंत आले. कोणी गडगडत जातं. कोणी धडपडत जातं. हे थेट वाहत आले,' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली.

राज ठाकरे म्हणतात...

  1. सरदार वल्लभभाई पटेल पुतळा उभारला, पण शिवरायांचा नाही
  2. मोदी, ठाकरे, फडणवीस यांनी समुद्रात फुले टाकली; आता त्यांना जागाही दाखवता येणार नाही
  3. माझा पुतळ्यांना विरोधच; शिवरायांचे गडकिल्ले पुन्हा सूस्थितीत आणा
  4. विधानसभेत आज, सरकारला जाब विचारण्याची गरज
  5. राज्यात, देशात सक्षम विरोधी पक्ष नाही; तो मला उभा करायचा आहे
  6. निवडणुकीवर बहिष्कार टाकायला इतर पक्ष तयार झाले नाहीत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 mns chief raj thackeray pune speech statement shivsena balasaheb thackeray