Raj Thackeray Hanuman Maha Aarti  Hanuman in Hanuman Temple
Raj Thackeray Hanuman Maha Aarti Hanuman in Hanuman Templesakal

आधी महाआरती...आज पत्रकार परिषद, राज ठाकरेंचा पुणे दौरा चर्चेत

राज्यातील मशिदींच्या भोंग्यांवरून मनसेने मैदानात उडी घेतली आहे. येत्या ३ तारखेपर्यंत हे भोंगे न हटल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. ठिकठिकाणी सार्वजनिक पद्धतीने हनुमान चालिसा पठण मनसेच्या वतीने करण्यात येणार आहे. (Raj Thackeray in Pune)

ठाण्यातील उत्तर सभेनंतर राज ठाकरे यांनी लगेच पुण्याकडे कूच करत राजकीय घडी बसवण्याचा प्रयत्न केला. पुण्यात येताच हनुमान जयंतीला त्यांनी महाआरती केली.

Raj Thackeray Hanuman Maha Aarti  Hanuman in Hanuman Temple
राज ठाकरेंकडून पुण्यात महाआरती, हनुमान चालीसा पठण; पाहा फोटो
Raj Thackeray Hanuman Maha Aarti  Hanuman in Hanuman Temple
राऊतांची गाडी पल्टी... मनसेकडून सामना कार्यालयासमोर बॅनरबाजी

आज दुपारी 12 वाजता ठाकरेंची पुण्यात पत्रकार परिषद आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधत त्यांनी टीका केली.

गृहमत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मनसेच्या अल्टिमेटमला केराची टोपली दाखवली. मशिदींवरील भोंगे उतरवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार, त्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

ठाण्यातील उत्तर सभा संपताच राज ठाकरेंनी पुण्यात येत खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. त्यांनी हनुमान चालिसाचेही पठण केलं. राज्यातील निवडणुकांआधी मोठं ध्रुवीकरण जन्मला येत असल्याची चाहूल सध्या मनसेच्या भूमिकेवरून स्पष्ट झालं आहे. याआधी पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती होती. अखेर राज ठाकरे यांनी दोन दिवसांचा पुणे दौरा आखला.

काल पार पडलेल्या महाआरतीला पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी भगवी शाल आणि गदा देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केलं. आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत. यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com