
मावळ तालुक्यातल्या कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिलीय. राज ठाकरे यांनी या दुर्घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणी प्रवेशबंदी का केली नाही? नवा पूल का बांधला नाही? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, प्रत्येक घटनेनंतर सरकारमधल्या लोकांची एकच प्रतिक्रिया असते की बचावकार्य वेगानं सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.