Rajgad Leopard : राजगडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकरी भयभीत; शेतकामासाठी मजूर मिळेनात!

Farmer Fear : अठरा गाव मावळ परिसरात प्रकाश जाधव यांच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्या. या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून हल्ल्यांची नोंद घेतली.
Fear Among Farmers Leads to Shortage of Farm Labor

Fear Among Farmers Leads to Shortage of Farm Labor

sakal

Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यामध्ये दहा दिवसांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांत आठपेक्षा अधिक पशुधनांचा मृत्यू झाला असतानाच तालुक्याच्या दुर्गम भागासह पूर्व पट्ट्यात बिबट्यांकडून हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या भीतीने भात काढणीला शेतमजूर मिळत नसल्याची खंत परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. राजगड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या अठरा गाव मावळ परिसरात गुरुवारी (ता. १३) वरोती गावामधील प्रकाश जाधव यांच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्या असल्याची माहिती रमेश शिंदे यांनी दिली. या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाहणी करून पंचनामा केला आहे.

Fear Among Farmers Leads to Shortage of Farm Labor
Kolhapur Leopard: फक्त पंधरा सेकंदात बिबट्याची झेप! वनात सोडताच अचूक अंदाज घेत जंगलात गायब व्हिडिओ व्हायरल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com