शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार चलबिचल; खासदाराची माहिती

rajya sabha member sanjay kakade statement about shiv sena mla
rajya sabha member sanjay kakade statement about shiv sena mla

पुणे ः शिवसेनेचे 56 पैकी तब्बल 45 खासदारांना भाजपबरोबरील सत्तेत सहभागी होण्याची तीव्र इच्छा असून त्यांच्या-त्यांच्या नेत्यांमार्फत ते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे राज्य सभेतील सहयोगी खासदार संजय काकडे "सकाळ'शी बोलताना यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील यांना माननारे आमदार त्यांच्या-त्यांच्या मागे आहेत. त्याच धर्तीवर शिवसेनेमध्येही चार प्रमुख नेत्यांना "फॉलो' करणारे आमदार आहेत. या आमदारांना राज्य सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणून सहभागी व्हायचे आहे. मात्र, शिवसेनेचे नेते सरकार स्थापन करण्यासाठी ताणून धरीत आहेत. त्यामुळे हे आमदार चलबिचल झाले आहेत. त्यांनी त्यांच्या- त्यांच्या नेत्यांकडे सरकारमध्ये सहभागी होण्याचा दबाव वाढविला आहे. ते चार नेते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा दावा काकडे यांनी केला आहे.

युतीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मतदारांनी सत्ताधारी पक्षाचे सदस्य व्हावेत म्हणून कौल दिला आहे. विरोधात बसण्यासाठी कौल दिलेला नाही. मतदारांनी युतीचा धर्म पाळला आहे. आता शिवसेनेनेही मतदारांच्या इच्छेचा मान ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही काकडे यांनी केले आहेत.

काय आहे राजकीय स्थिती?
भाजपने राज्यात एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण, हे स्वप्न भंगलंय. राज्याच्या जनतेने दिलेला कौल स्पष्ट बहुमताचा नाही. भाजपला शिवसेनेच्या बरोबरीनेच सरकार  स्थापन करता येणार आहे. दोन्ही पक्ष सध्या एकमेकांवर दबाव टाकून जास्तीत जास्त खाती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगून सेनेवर दबाव टाकला जात आहे. तर, शिवसेनेतूनही समान खाते वाटपाची वक्तव्ये होऊ लागली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित खाती मिळाली नाहीत. त्यामुळं पाच वर्षे शिवसेनेला ते सहन करावे लागले. शिवसेनेचे आमदार खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. मुंबई महापालिकेतही दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com