राम मंदिर हा देशाच्या आंतरिक शक्तीचा आविष्कार; RSSच्या सभेत ठराव मंजूर

Ram_Temple
Ram_Temple
Updated on

पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माणाचा प्रारंभ हा देशाच्या आंतरिक शक्तीचा अविष्कार आहे, त्या बद्दल देशातील नागरिकांचे अभिनंदन करण्याचा ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मंजूर झाला. तसेच एक राष्ट्र - एक समाज म्हणून एकजुटीने केलेल्या कोरोनाच्या मुकाबल्याबद्दलही प्रतिनिधी सभेने नागरिकांचे अभिनंदन केले आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (ता.२४) येथे दिली.

संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळुरूमध्ये नुकतीच झाली. त्यातील निर्णयांची माहिती दबडघाव यांनी या प्रसंगी दिली. या वेळी महानगर कार्यवाह महेश कर्पे, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी या प्रसंगी उपस्थित होते. या सभेला संघाचे देशातील सुमारे ४५० सदस्य उपस्थित होते.

राम मंदिराचे गेल्यावर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मंदिराच्या बांधकामाची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. त्याची दखल प्रतिनिधी सभेने घेतली आणि नागरिकांचे अभिनंदनही केले. तसेच कोरोनाचा मुकाबला करताना देशातील अत्यावश्यक सेवांतील अधिकारी, कर्मचाऱयांनी नागरिकांच्या मदतीने एकजूट दाखविली. तसेच वित्तीय संस्थांतील कर्मचाऱयांसह संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित अनेक समूहांच्या सक्रियतेमुळे दैनंदिन जीवन सुरळीत झाले. त्यासाठी शासकीय स्तरावरून झालेले प्रयत्न, श्रमिक ट्रेन, वंदे भारत मिशन आणि सध्या सुरू असलेले लसीकरण अभियान प्रशंसनीय आहे, असेही प्रतिनिधी सभेने मंजूर केलेल्या दुसऱया मंजूर झालेल्या ठरावात म्हटले आहे.

संघ शाखांची सद्यस्थिती
देशात गेल्या मार्चमध्ये ३८ हजार ९१३ ठिकाणी ६२ हजार ४७७ शाखा सक्रिय होत्या तर, यंदाच्या मार्च महिन्यात ३४ हजार ५६९ ठिकाणी ५५ हजार ६५३२ शाखा सुरू आहेत. कोरोनामुळे संघ शाखांतील उपस्थितीवर सुमारे २० टक्के परिणाम झाला आहे. मात्र, सेवा कार्यातील स्वयंसेवकांची संख्या वाढती असल्याचे निरीक्षण डॉ. दबडघाव यांनी नोंदविले.

पुण्यात लसीकरणाला गती देणार
कोरोनाच्या आपत्तीत गेल्यावर्षी पुण्यात संघाने कोविड केअर सेंटर चालविले. वस्त्यांत जागरूकता मोहिम, मास्क वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच सध्या दुसरी लाट आल्याचे तज्ज्ञ सांगत असल्यामुळे संघाने पुन्हा सेवा कार्यांवर भर देण्याचे नियोजन केले असल्याचे महानगर कार्यवाह महेश कर्पे यांनी सांगितले. प्रशासकीय स्तरावरून सध्या कोरोनाच्या लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात संघाचे स्वयंसेवकही सहभागी होणार असून प्रशासनाला मदत करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळातील संघाचे कार्य
- देशात ९२ हजार ६५६ ठिकाणी सेवा कार्य
- ५ लाख ६० हजार स्वयंसेवकांचा सहभाग
- जीवनावश्यक ७३ लाख वस्तूंचे वाटप
- ४ कोटी ५० लाख नागरिकांना भोजन पॅकेटचे वितरण
- २० लाख प्रवाशांना मदत
- ६० हजार युनिट रक्तदान

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com