ऍट्रॉसिटीची भीती दाखवत उकळली 75 लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

नामांकित डॉक्‍टरच्या मुलाविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून डॉक्‍टरकडून तब्बल ७५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला.

पुणे - नामांकित डॉक्‍टरच्या मुलाविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून डॉक्‍टरकडून तब्बल ७५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरही उर्वरित ५५ लाख रुपयांसाठी डॉक्‍टरकडे तगादा लावल्याने खंडणीखोराविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनोज अडसूळ-अत्रे (वय ४५, रा. नवी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. दीपक प्रभाकर रासने (रा. तपोवन सोसायटी, पर्वती) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचा मुलगा डॉ. साहिल रासने यांच्याविरुद्ध एका महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात ऑक्‍टोबर २०१९ मध्ये विनयभंगाची तक्रार दिली होती. या प्रकरणासंदर्भात अडसूळ याने फिर्यादीस तुमच्या मुलाविरुद्ध विनयभंग, ॲट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, त्यास तीन ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी धमकी देत त्यांच्याकडे एक कोटी तीस लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीला खोटे आश्‍वासन देऊन त्याने त्यांच्याकडून धनादेशाद्वारे ५४ लाख व रोख रक्कम २१ लाख असे एकूण ७५ लाख रुपये घेतले. त्यानंतर उर्वरित ५५ लाख रुपयांची रक्कम न दिल्यास मुलास अटक  होईल, अशी धमकी देत पैशांसाठी तगादा लावला. 

दृष्टिहीनांसाठी ‘डोळस’ प्रयोग

याप्रकरणी फिर्यादी यांनी जयेश कासट यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. मात्र अडसूळ याने कासट यांनीच आपल्याकडे पैसे मागितल्याची तक्रार खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाकडे केल्याचे फिर्यादीच्या जबाबामध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाच्या पडताळणीनंतर पोलिसांनी अडसूळविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ransom of Rs 75 lakh From a doctor fear of atrocity in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: