आई-वडिलांना धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गर्भवती

अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध
Rape a minor girl
Rape a minor girlsakal

उरुळी कांचन (पुणे) : अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दारू पाजून मारून टाकील व आईला काहीतरी करील अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका पंचवीस वर्षीय तरूणाविरोधांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनु ऊर्फ सिध्दराम ज्ञानेश्वर भालेराव (वय- २५, रा. बोरकर वस्ती, उरळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Rape a minor girl
पूर्व विदर्भात मलेरियाचे थैमान; तर ३० लाख लोकसंख्येच्या नागपुरात ३ रुग्ण

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई वडील दोन बहिणी व एक भाऊ यांचेबरोबर उरुळी कांचन परिसरात राहतात. वडील मजुरी तर आई मिळेल त्या ठिकाणी धुनी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भालेराव याची सदर कुटुंबाशी ओळख असल्याने पिडीतेच्या घरी त्याचे येणेजाणे सुरु होते.

रविवारी (ता. ०६) पिडीत मुलीने आईस पोटात दुखत असल्याचे कारण सांगितले. पिडीत मुलीला चिंचवड या ठिकाणी एका रुग्णालयात घेऊन गेले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घरी आलेनंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता पिडीत मुलीने सोन्या भालेराव याने माझ्यासोबत लैंगिक प्रस्थापित संबंध केले.

Rape a minor girl
TET घोटाळ्यात कारवाई, राज्यातील ७,८०० बोगस शिक्षकांची यादी तयार

दरम्यान, याबाबत जर कोणाला सांगितले तर वडिलांना दारू पाजून मारून टाकील व आईला काहीतरी करील अशी धमकी दिली. त्यामुळे मी कोणाला काहीएक सांगतले नाही. यानंतर पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौघुले या करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com