मच्छीमार दाम्पत्यांना सापडले चमकणारे दुर्मिळ कासव

A rare Indian star tortoise has been found in Dixal 2.jpg
A rare Indian star tortoise has been found in Dixal 2.jpg

भिगवण : दुर्मिळ प्रजाती म्हणून ओळख असलेले इंडियन स्टार जातीचे कासव उजनी जलाशयातील पाण्याच्या डिकसळ(ता.इंदापूर) येथील फुगवटयामध्ये मच्छीमार दांम्पत्यास सापडले आहे. उजनी धरणाच्या निर्मितीपासून मागील ४० वर्षामध्ये प्रथमच हे आकर्षक कासव दिसून आले आहे. हे कासव सुखरुप वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे कासव मिळालेल्या दांम्पत्याने सांगितले.

इंदापूर तालुक्यातील डिकसळ उजनी धरणातील पाण्याच्या फुगवटयांमध्ये विनोद काळे व त्यांची पत्नी शिवानी काळे हे सकाळी मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असताना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये पाण्यामध्ये काहीतरी चमकत असल्याचे काळे दाम्पत्यास निदर्शनास आले. त्यांनी चमकणाऱ्या वस्तूजवळ जाऊन पाहणी केली असता ते दुर्मिळ प्रकारचे कासव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मच्छीमार दाम्पत्यांनी याबाबत स्थानिक नागरिक व वनविभागास याबाबत कल्पना दिली.

या वेगळ्या कासवाबाबत अधिक माहिती घेतली असता ते कासव इंडियन स्टार जातीचे दुर्मिळ कासव असल्याची माहिती मिळाली. सदर कासवाच्या कवचावर सोनेरी रंगाचे स्टार आहेत त्यामुळे हे कासव अतिशय मनमोहक दिसत आहे. हा कासव अतिशय दुर्मिळ असून  दुर्मिळ प्रजातीमध्ये या कासवाचा समावेश आहे. दुर्मिळ कासव उजनी जलाशयांमध्ये आढळून आल्यामुळे उजनी धरणातील असलेल्या जैवविविधतेकडे पर्यावरण अभ्यासकांचा ओढा पु्न्हा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

याबाबत पर्यावरण अभ्यास डॉ. महमंद मुलाणी म्हणाले, इंडियन स्टार हे कासव भारत, पाकिस्तान, श्रीलंका येथील कोरडया भागात व खुज्या जंगलात आढळणारी प्रजाती आहे. हे कासव १० इंचापर्यंत वाढु शकते. उजनी जलाशयांमध्ये हे कासव आढळून येणे ही दुर्मिळ घटना आहे. हे कासव उजनी जलाशयांमध्ये कसे आले व आणखी किती कासव जलाशयांमध्ये आहेत, याबाबत संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com