

Ravindra Dhangekar’s Viral Post Rekindles Political Storm in Pune
Esakal
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरून सध्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. धंगेकर यांनी सोशल मीडियावरून गेल्या दोन आठवड्यात अनेक आरोप मोहोळ यांच्यावर केले आहेत. आता मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या वरिष्ठांकडून जैन मंदिर किंवा मंत्रीपद वाचवा अशी वॉर्निंग देण्यात आल्याचा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केलाय.