संवेदनशील नेतृत्व म्हणून राजीव गांधींची ओळख : नाना पटोले

राजीव गांधी यांच्या संस्कारांची ऊणीव आज भासत असल्याचे त्यांनी सांगितले.
pune
punesakal

कात्रज : दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची ओळख विकासाभिमुख असण्याबरोबरच संवेदनशील नेतृत्व म्हणून होती, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. राजीव गांधी जयंतीनिमीत्त कात्रज येथील प्राणी संग्रहालयाच्या आवारातील राजीव गांधींच्या पुतळ्यांस अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित होते. (Pune News)

पटोले म्हणाले, राजीव गांधी यांच्या स्वभावनूरूप त्यांचा जयंतीदिन सद्भावना दिन म्हणून पाळणे हे याचेच द्योतक असून राजीव गांधी यांच्या संस्कारांची ऊणीव आज भासत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यावेळी राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक व काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

pune
तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

यावेळी शरद रणपीसे, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, आबा बागूल, कमलताई व्यवहारे, सोनाली मारणे, श्रीरंग चव्हाण पाटील, आबा जगताप, अवधूत मते, अर्चना शहा, सुर्यकांत मारणे रामचंद्र शेडगे, भूषण रानभरे यांच्यासह राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते ऊपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com