मोठ्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार! पुण्यात जुन्या सोसायट्या होणार रिडेव्हलप

The redevelopment of old societies is now possible
The redevelopment of old societies is now possible

पुणे: शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण करण्याचा पुणे महापालिकेने घेतलेला निर्णयामुळे जुन्या हद्दीतील रखडलेल्या अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे अनेकांचे मोठ्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

- धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली

नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास 28 जानेवारी 2016 रोजी राज्य सरकारने बंदी घेतली आहे. तोच निर्णय जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यास 2017 मान्यता देताना बांधकाम नियंत्रण नियमावलीमध्ये कायम करण्यात आला. या निर्णयामुळे कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, बिबवेवाडी, सातारा रस्त्याच्या बराचसा परिसर, सॅलसबरी पार्क, गुलटेकडी, बोट क्‍लब रोड आदी जुन्या हद्दीतील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेल्या सुमारे तीस ते चाळीस वर्ष जुन्या असलेल्या सोसायट्यांच्या पुनर्विकास रखडला होता. त्यामुळे या सोसायट्यातील रहिवाशांचे मोठ्या घराचे स्वप्न कागदावरच राहिले होते. त्यातून मार्ग काढावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सोसायट्यातील रहिवाशांकडून केली जात होती.

- पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांचे 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीकरण करून त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडला होता. स्थायी समितीने त्यास मान्यता दिली. त्यावर हरकती-सूचना मागून त्यानंतर त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 323 रस्त्यांचा समावेश असला, तरी टप्याटप्प्याने शहराच्या जुन्या हद्दीतील सर्वच रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील अडकून पडलेल्या शेकडो सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे. या बहुतांश सोसायट्यांमध्ये पार्किंगसह अनेक सुयी सुविधा नाहीत, त्या मिळण्यास मदत होणार आहे.

- कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी!

''कोथरूड मधील शिवतीर्थनगरच्या जवळील मधुकोमल सोसायटी मी राहतो. चाळीस वर्ष जुनी सोसायटी आहे. अशा आमच्या परिसरात दहा सोसायट्या आहेत. सोसायटीपुढील रस्ता सहा मीटर रूंदीचा आहे. त्यामुळे सोसायटीचा पुनर्विकास रखडला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे तो आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.''
- चंद्रशेखर कुलकर्णी (रहिवाशी)
पुण्यातील मार्केट यार्डाबाबत महत्वाचे अपडेट; वाचा सविस्तर


''आमची प्रभात रस्त्यावर विनायक सोसायटी आहे. सोसायटीपुढील रस्ता सहा मीटर रूंदीचा आहे. टीडीआर मिळत नसल्यामुळे कोणतीही बांधकाम व्यावसायिक पुनर्विकासासाठी पुढे येत नव्हते. आता मात्र सोसायट्याचे पुनर्विकासाचे स्वप्न या निर्णयामुळे मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.''
- संजीव फणसळकर (रहिवाशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com