esakal | मोठी बातमी: कार्तिकी एकादशीला दिंड्यांना परवानगी नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Wari

राज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत.

मोठी बातमी: कार्तिकी एकादशीला दिंड्यांना परवानगी नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार काही मान्यवरांच्या उपस्थितीत आणि कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत, याबाबत पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने आवश्‍यक खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

Corona Updates: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनानं कसली कंबर; विशेष उपाययोजनांवर भर!​

कार्तिक शुद्ध एकादशी ही एक महत्त्वपूर्ण एकादशी आहे. कार्तिकी यात्रेचा कालावधी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. राज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत. त्यामुळे कार्तिकी शुद्ध एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्‍यता आहे. परंतु कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे दिंड्या दाखल होणार नाहीत, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...​

विधी व न्याय विभागाचे आदेश

यंदा कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून पंढरपूर येथे दिंड्या दाखल होऊ देऊ नयेत, असे आदेश विधी व न्याय विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे यंदा कार्तिकीसाठी कोणतीही दिंडी पंढरपूरकडे येऊ शकणार नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image