आम्हाला पैसे मिळणार तरी कधी? बांधकाम मजुरांचा आक्रोश 

Registered construction workers did not get help from Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board
Registered construction workers did not get help from Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board
Updated on

पुणे  : लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या मजुरांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय होऊन एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप सुमारे पाच लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांना मदत मिळालेली नाही. रोजच्या जेवणाची मारामार असताना आम्हाला एवढ्या दिवस वाट पहावी लागत आहे. त्यामुळे नेमकी मदत मिळणार तरी कधी? असा आक्रोश कामगारांनी केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमुळे अन्य उद्योगांप्रमाणेच बांधकाम व्यवसायही ठप्प झाला आहे. याचा फटका राज्यभरातील मजुर वर्गाला बसला आहे. या मजुरांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये मदत जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 18 एप्रिल रोजी घेतला होता. त्यानुसार 21 एप्रिलपासून वाटप सुरू झाले आहे. राज्यातील 12 लाख 18 हजार मजुरांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यातील 7 लाख 25 हजार सभासदांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र, उर्वरित मजुरांची उपासमार अजूनही सुरू आहे. त्यात ही मदत मिळण्यास उशीर होत असल्याने आम्ही खायचे तरी काय असा? प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बांधकाम व्यावसायिकांकडून सेजच्या रूपात जमा झालेले नऊ हजार कोटी रुपये मंडळाकडे जमा आहेत. त्यातील 240 कोटी रुपये कामगारांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत.

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

मंडळांना मिळेना डेटा व मनुष्यबळ: 
नोंदणीकृत मजुरांची माहिती जिल्हा पातळीवरून मागवण्यात येत आहे. मात्र संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सध्या पुरेसे मनुष्यबळ जिल्हा पातळीवर उपलब्ध नाही. प्राप्त झालेल्या  अर्जामध्ये अनेक चुका असतात. त्यामुळे प्रत्येक सभासदाची छाननी करूनच त्याच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या छाननीतून तब्बल एक लाख अर्ज पुन्हा पाठवण्यात आले आहेत. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असून पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मदतीचे वाटप करण्यास विलंब होत आहे.  बांधकाम मजुरांना लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. 

पुणेकरांनो कोरोनाच्या उपचाराच्या खर्चाची चिंता सोडा; ही बातमी वाचा!

''सरकारच्या इतर गोष्टींप्रमाणे ही घोषणा देखील कुचकामी आहे. गरज आहे तेव्हा पैसे मिळाले नाही तर त्याचा काय उपयोग? ऑनलाईन नोंदणीचा घोळ घातल्याने अनेकांची नोंदणी देखील झाली नाही. त्यामुळे ते सर्व कामगार या मदतीला मुकले आहेत. 2011 पासून नोंदणी असलेल्या 60 वर्षाच्या आतील सर्व कामगारांना  हजार रुपये द्यावे, अशी आमची मागणी आहे.''
- वसंत पवार, सचिव, बांधकाम कामगार संघटना

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

- 12 लाख 18 हजार नोंदणीकृत सक्रिय मजूर
- प्रत्येकी दोन हजार रुपये मदत मिळणार
- मंडळाकडे नऊ हजार कोटी रुपये जमा
- 240 कोटींचे होणार वाटप
- आत्तापर्यंत 7 लाख 25 हजार सभासदांना मदत
- 4 लाख 93 हजार मदतीच्या प्रतीक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com