शिरुरमध्ये तहसीलदारांच्या घराची वाळूमाफियांकडून रेकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

तहसीलदार शेख यांनी याप्रकरणी शिरूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे बेकायदा मातीचे उत्खनन व वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने शेख यांनी निवासी नायब तहसीलदारांना घटनास्थळी पाठवले. तेथे असा काही उपसा सुरू नसल्याचे तहसीलदारांनी त्यांना कळविले. समक्ष पाहणी करण्यासाठी त्या पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी निघाल्या. 

शिरूर(पुणे) : शिरूर तहसीलदार लैला शेख यांच्या घराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून हेरगिरी होत आहे. आज अशाच प्रकारे हेरगिरी व दहशत निर्माण करणाऱ्या पाच ते सात जणांशी त्यांची बाचाबाची झाली. दरम्यान, पोलिस येताना पाहून ते पळून गेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तहसीलदार शेख यांनी याप्रकरणी शिरूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे बेकायदा मातीचे उत्खनन व वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने शेख यांनी निवासी नायब तहसीलदारांना घटनास्थळी पाठवले. तेथे असा काही उपसा सुरू नसल्याचे तहसीलदारांनी त्यांना कळविले. समक्ष पाहणी करण्यासाठी त्या पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी निघाल्या. 

पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर

रेव्हेन्यू कॉलनी येथे त्यांचे 'इंद्रप्रस्थ' हे शासकीय निवासस्थान आहे. घरातून बाहेर पडताना कंपाउंडच्या भिंतीआडून तोंडाला रुमाल बांधलेले दोघेजण डोकावून पाहात असल्याचे दिसल्याने त्यांनी जाब विचारला, तेव्हा त्यांनी उद्धट भाषा वापरली. तहसीलदारांनी त्यांच्या पतीला हाक मारली. त्यांच्याशीही त्या दोघांची झटापट झाली व दोघेजण पळून गेले. त्या वेळी घरासमोर एमएच 12 क्‍यूवाय 3168 ही 'आय ट्‌वेंन्टी' मोटार उभी होती. त्या झटापटीत एकाचा मोबाईल तेथे पडला, तो तहसीलदारांनी हस्तगत करून पोलिसांना फोन केला. लगेचच दुसऱ्या वाहनातून पाच - सहाजण तेथे आले व त्यांनी मोबाईल मागत तहसीलदारांशी हुज्जत घातली. त्यादरम्यान, पोलिस वाहन येत असल्याचे दिसताच ते सर्वजण, "आय ट्‌वेन्टी' मोटारीसह पळून गेले. 

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण

शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहशत पसरविणे, दमदाटी, हेरगिरी व झटापट करून हल्ल्याचा प्रयत्न करणे या गंभीर गुन्ह्यांबरोबरच शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. 

पुणे महापालिकेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूष करण्यासाठी काय घेतला निर्णय

''माझ्यावर पाळत ठेवली जाते. याबाबत शिक्रापूर पोलिसांना कळविले आहे. मंगळवारी (ता. 11) कारेगावजवळही एका विनाक्रमांकाच्या "स्विफ्ट' मोटारीने माझ्या मोटारीला कट मारला. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ''

- लैला शेख, तहसीलदार, शिरूर 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reiki of the tahsildar house in Shirur by sand mafia