Jumbo_Covid_Center_pune
Jumbo_Covid_Center_pune

Pune Corona: ‘जम्बो’मध्ये रुग्णांची गैरसोय; नातेवाईकांनी वाचला तक्रारींचा पाढा

पुणे : जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी अन्य सुविधा तोकड्या पडत आहेत. पाणी, स्वच्छतेकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे; तर त्यांच्या नातेवाइकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेले दोन दिवस पाण्याची कमतरता होती. मात्र, आता पाणीपुरवठा सुरळीत आहे. स्वच्छतेलाही प्राधान्य आहे, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

गेल्या महिन्यापासून ‘जम्बो’ सुरू केले असून, त्यात सातशे रुग्णांची सोय आहे. मात्र, काही दिवसांतच उपचार व्यवस्थेची व्याप्ती वाढविल्यानंतर पायाभूत सुविधा अपुऱ्या ठरत असल्याचे पुढे आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे स्वच्छतागृहांमध्येही पाणी नसल्याने ऑक्सिजनचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना पाण्यासाठी फिरवावे लागले. तर काही रुग्णांना स्वच्छतागृहांत जातानाच पाणी घेऊन जावे लागल्याचेही रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. बेड वाढविताना अन्य सुविधा विस्तारण्यात येतील, असे ‘जम्बो’च्या व्यवस्थापनाकडून वारंवार सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, रुग्णांना दाखल करून घेतल्यानंतर उपचार देण्यापलीकडे अन्य सुविधा चांगल्या नसल्याचे रुग्ण, त्यांचे नातेवाइक सांगत आहेत.

‘जम्बो’तील रुग्णांवरील उपचार आणि तेथील पायाभूत सुविधा पुरवून त्यांच्या देखभालीसाठी दोन स्वतंत्र एजन्सी आहेत. त्यात मेडब्रोकडे उपचार तर दीपाली एजन्सीकडे पायाभूत सेवांच्या देखभालीची जबाबदारी आहे.
जम्बोचे अधिष्ठाता डॉ. श्रेयांस कपाले म्हणाले, ‘‘रुग्णांवरील उपचार, त्यांची प्रकृती, त्यातील चढ-उतार, नवी औषधे आणि ‘डिस्चार्ज’बाबत नातेवाइकांना माहिती दिली जाते. त्यासाठी स्वतंत्र डेस्क तयार करून ‘व्हिडिओ कॉलिंग’ची सोय केली आहे.’’

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणाल्या, ‘‘केवळ उपचारच नव्हे, तर रुग्णांना जेवणापासून अन्य बाबीं पुरविताना त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिले जात आहे. तरीही रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल, तर संबंधितांना नोटिस देऊन खुलासा मागविण्यात येईल.

‘जम्बो’ची क्षमता आठशे बेडची आहे. त्यानुसार आतापर्यंत सातशे बेड सुरू केले आहेत. उर्वरित शंभर बेडही तयार करण्यात येत आहेत. त्याचवेळी डॉक्टर आणि अन्य कर्मचारीही त्याप्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे उपचार व्यवस्था सक्षम होईल.
- राजेंद्र मुठे, समन्वयक, जम्बो

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com