esakal | कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी हट्ट धरु नये : दत्तात्रेय भरणे

बोलून बातमी शोधा

covid19
कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी हट्ट धरु नये : दत्तात्रेय भरणे
sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी डाॅक्टरकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच वापर करण्याचा हट्ट धरु नये. पुढील आठवड्यामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील कोरोना केअर सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी नागरिकांशी व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकासधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल गावडे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, वालचंदनगरचे सरपंच संतोष (कुमार) गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अरुण वीर, अंबादास शेळके, संदीप पाटील, रविराज खरात उपस्थित होते.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

यावेळी भरणे यांनी सांगितले की, अनेक कोरोना रुग्णांना गरज नसताना रुग्णाच्या कुंटूबातील नागरिक व नातेवाईक रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याचा हट्ट धरत आहेत. तसेच मला ही दररोज रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करुन द्या असे फोन येत आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यासंदर्भात निर्णय हा डाॅक्टरांना घेवू द्या. त्यांच्यावर इंजेक्शन देण्यासाठी दबाब टाकू नका. माझ्या जवळच्या एका व्यक्तीला गरज नसताना ही रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल.त्यांसदर्भात मंत्रालयामध्ये नुकतीच एक बैठक झाली असून बैठकीला इंजेक्शन निर्मिती करणारे कंपन्याचे मालक उपस्थित होते. इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णावरती उपचार करण्यासाठी ९६५ बेड उपलब्ध आहेत.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

तसेच भिगवणमध्ये नव्याने ऑक्सिजन बेड उपलब्ध केले आहेत.गरज पडल्यास तातडीने शासकीय वस्तीगृह तसेच विद्या प्रतिष्ठानच्या इमारतीमध्ये तात्काळ बेड उपलब्ध करुन दिले जातील. नागरिकांनी कोरोनावरती मात करण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे. १ मे पासून १८ वर्षाच्या वरील युवक व नागरिकांनी लस उपलब्ध होणार असून जास्तीजास्त नागरिकांनी लस टोचून घ्यावी. तसेच प्रशासनाने लसीकरण मोहिमेला गती द्यावी.यावेळी भरणे यांनी कोरोना रुग्णांशी संवाद साधून मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.तसेच कोरोना रुग्णांना तात्काळ अपुऱ्या असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या.

'त्रिसुत्रीचा वापर करा'- काेरानावरती मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणाराबरोबर मास्क,सॅनिटायझर व दोन व्यक्तीमधील सुरक्षीत अंतर या त्रिसुत्रीचा वापर करण्याचे आवाहन दत्तात्रेय भरणे यांनी केले.