Corona Virus : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कर्नाटक राज्यातील 450 कामगारांना दिलासा

डॉ. संदेश शहा
Saturday, 28 March 2020

घरी कुटुंबाची उपजीविका भागत नाही म्हणून ते जगायला मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड येथे एक वर्षांपूर्वी आले होते. मात्र कोरोना व्हायरसचाप्रचार रोखण्यासाठी जनता कर्फ्यु व त्यानंतर संचारबंदी लागू होताच त्यांचे काम बंद झाले. त्यामुळे त्यांची व त्यांच्या मुलाबाळांची उपासमार सुरूझाली. त्यातच संचारबंदीमुळे एस.टी व रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे त्यांनी अखेर घरचा रस्ता पकडला. मजलदरमजल करत ते इंदापूरला आले. मात्र, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी सरडेवाडी टोल नाक्यावर ते अडकले.

इंदापूर : सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे संचारबंदीत अडकलेल्या कर्नाटक राज्यातील 450 कामगारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या घरी जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.                    

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
घरी कुटुंबाची उपजीविका भागत नाही म्हणून ते जगायला मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड येथे एक वर्षांपूर्वी आले होते. मात्र कोरोना व्हायरसचाप्रचार रोखण्यासाठी जनता कर्फ्यु व त्यानंतर संचारबंदी लागू होताच त्यांचे काम बंद झाले. त्यामुळे त्यांची व त्यांच्या मुलाबाळांची उपासमार सुरूझाली. त्यातच संचारबंदीमुळे एस.टी व रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे त्यांनी अखेर घरचा रस्ता पकडला. मजलदरमजल करत ते इंदापूरला आले. मात्र, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी सरडेवाडी टोल नाक्यावर ते अडकले.

- 'नमस्ते, तुम्ही स्वत:ची काळजी घेत आहात ना?' पंतप्रधानांनी केली पुण्यातील नर्सेसची विचारपूस!

आढावा बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना तहसीलदार सोनाली मेटकरी, पोलीसनिरीक्षक नारायण सारंगकर यांनी माहिती देताच भरणे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार, नितीन करीर, विभागीय आयुक्त यांना फोन लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करुन त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जिल्हा बंधीचा आदेश असल्याने कामगारांची सोय अथर्व लॉन्स येथे करण्यात आली.

- शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

सर्वजण हुमनाबाद परिसरातील असल्याने हा आंतरराज्य प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हा प्रश्न मिटेपर्यंत त्यांना सोनाई दूध संघाने दुध तर युवा क्रांती प्रतिष्ठानचेसंस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप, अध्यक्ष अस्लम शेख,माजी अध्यक्ष पियुष बोरा, दशरथ भोंग, सचिन परबते , भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंदलोढा, महेंद्र गुंदेचा, नरेंद्र गांधी यांनी जेवणाचा शिधा दिला तर सरडेवाडी येथील अस्लम शेख याने त्यांना जेवण बनवून दिले. दरम्यान हा प्रश्न न मिटल्याने आज रोजी सकाळी देशपांडे व्हेजचे उदय देशपांडे, किरण गानबोटे तसेच इंदापूर ब्राह्मणसेवा संघाने त्यांना भोजन देऊन माणुसकी जपली.

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'नीट' परीक्षेस स्थगिती!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief to 450 Karnataka workers trapped in lockdown due to Corona Virus