esakal | लेण्याद्रीचे कोविड सेंटर ठरतेय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी

बोलून बातमी शोधा

covid center
लेण्याद्रीचे कोविड सेंटर ठरतेय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी
sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र येथील श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे कोविड केअर सेंटर तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. गेल्या वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असून एका विषाणूने लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. याच संकट काळात (ता. २२ मे २०२० रोजी) उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे यात्रीनिवास विश्वस्त मंडळाने सर्वप्रथम शासनास विनामोबदला उपलब्ध करून दिले. दरम्यान या यात्री निवास सभागृहात पंचवीस हजार चौरस फुटाचा सभा मंडप, ६४ रूम व इतर दोन छोटे हॉल आहेत. श्री लेण्याद्री गिरिजात्मजकाच्या पायथ्याशी असलेल्या या कोविड सेंटर मध्ये गेल्या वर्षांपासून शनिवार ता. १८ पर्यंत एकूण ४ हजार ७५३ रुग्णांची नोंद झाली. यापैकी ४८६ रुग्णांना पुढील उपचारासाठी शहरात पाठविण्यात आले. एक हजार १२८ रुग्ण घरीच बरे झाले तर २ हजार ६८८ रुग्ण लेण्याद्री कोविड सेंटर मधून बरे होऊन सुखरूप घरी गेले. ते केवळ श्री गिरीजात्मजकाचा आशिर्वाद आणि येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आरोग्य सेवकांमुळे शक्य झाले असल्याची भावना रुग्णाकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

एका वेळेस ३५० रुग्ण राहू शकतील एवढी व्यवस्था लेण्याद्री कोविड सेंटरमध्ये केलेली आहे. कुठल्याही रुग्णाकडून शुल्क न घेता दाखल केले जाते तसेच औषधे दिली जातात. ऑक्सीजन, पल्स, तापमान,शुगर याची दिवसातून तीन वेळा तपासणी केली जाते. चहा, दूध, नाश्ता व दोन वेळेचे चांगले जेवण देखील दिले जाते. तसेच दररोज शंभरहून अधिक संशयित रुग्णाचे स्वब तपासणी साठी घेण्यात येत आहेत. या यात्री निवास भाग दोन मधून देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाकडे न पाहता देवस्थानच्या विश्वस्तांनी यात्री निवास कोरोना सेंटर साठी देण्याचा निर्णय घेतला त्याचा हजारो रुग्णांना फायदा झाला आहे. विश्वस्त मंडळाने सामाजिक जाणिवेतून ही इमारत शासनास दिली आहे त्यामुळे सर्व विश्वस्त मंडळ तसेच शासकीय अधिकारी कोविड सेंटरचे व्यवस्थापन व नियोजन करत आहेत.यात तहसीलदार, गटविकास अधिकारी,पोलीस प्रशासन, जुन्नर नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी या सर्वांचे योगदान आहे.

हेही वाचा: जुन्नर : ट्रॅक्टर अपघातात वडील-मुलाचा दुर्दैवी मृत्यू