भोरमधील कोरोनाग्रस्ताच्या पत्नी व मुलाचा अहवाल...

विजय जाधव
गुरुवार, 28 मे 2020

भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या वाढीचा आलेख उंचावत चालला असून, गुरुवारी (ता. २८) सकाळी आणखी दोन कोरोनाग्रस्त आढळून आले.

भोर (पुणे) : भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या वाढीचा आलेख उंचावत चालला असून, गुरुवारी (ता. २८) सकाळी आणखी दोन कोरोनाग्रस्त आढळून आले.

सोमवारी (ता. २५)  मानकरवाडी येथील आढळलेल्या कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा व मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी सांगितले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दहावर पोचली आहे. 

एसटीकडून प्रवासी नव्हे तर मालवाहतुकीसाठी जाहिराती   

मानकरवाडीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील तिघांचे अहवाल सोमवारी तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह, तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. लॉकडाउननंतर तालुक्यातील ११५ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत तालुक्यात १५ जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यापैकी पाच जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रायरी ग्रामपंचायतीमधील ६, मानकरवाडीतील ३ आणि वरोडी खुर्दमधील १, असे दहा जण कोरोनाशी लढत आहेत. प्रशासनाने रायरी ग्रामपंचायतीमधील ५, वरोडी खुर्द येथील ५, रायरीमधील धारांबेवस्तीचे ९, अशा एकूण १९ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविले आहेत. 

शेतकऱ्यांना रडवतोय कांदा, फुलांचाही वांदा...  

भोर शहराच्या सीमा बंद 
भोर तालुक्यात कोरोनोग्रस्तांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळे शहरात ग्रामदूताशिवाय बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी शहराच्या सीमा पूर्वीसारख्या बंद करण्यात येणार असून, तेथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. केवळ अत्यावश्यक कामाची खात्री झाल्यावरच संबंधित व्यक्तीला शहरात प्रवेश दिला जाणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरातील दुकानदारांनी फक्त शहरातील स्वयंसेवक आणि ग्रामीण भागातील ग्रामदूताशिवाय इतर कोणालाही साहित्य न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक राजू मोरे यांच्यासमवेत झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The report of the wife and daughter of a Corona patient in Bhor taluka is also positive