झोपडपट्टीतील रहिवाशांचे तीन महिन्यांचे लाईट बिल माफ करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

शिधापत्रिकेवर धान्यांचे वाटप झाल्यामुळे दिलासादायक वातावरण असले तरी हातावर पोट असणारा कष्टकरी वर्ग चलनापासुन ( पैसा ) वंचित झाला आहे. हमाल , रिक्षाचालक, धुणे - भांडी करणाऱ्या महिला व अशा विविध कष्टकरी वर्गावर चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांचे मार्च, एप्रिल व मे या महिन्यांचे लाईट बिल माफ करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे  करण्यात आली आहे.

पुणे  : कोरोनामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांचे हाल होत असून त्यांचे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे लाईट बिल माफ करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, 'देशात व राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे . केंद्र व राज्य शासनाकडून वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे अनेक  व्यक्तींचा जीव वाचला आहे. 

Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका

शिधापत्रिकेवर धान्यांचे वाटप झाल्यामुळे दिलासादायक वातावरण असले तरी हातावर पोट असणारा कष्टकरी वर्ग चलनापासुन ( पैसा ) वंचित झाला आहे. हमाल , रिक्षाचालक, धुणे - भांडी करणाऱ्या महिला व अशा विविध कष्टकरी वर्गावर चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांचे मार्च, एप्रिल व मे या महिन्यांचे लाईट बिल माफ करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे  करण्यात आली आहे. या मागणीच्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून या मागणीच्या कार्यवाहीसाठी संबधित खात्याकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.' लॉक डाऊनच्या काळात सर्व पुणेकर  नागरिकांनी घरीच बसावे असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.
बारामतीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या...​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republican Party Demands Chief Minister to Forgive 3 Month Light Bill Of Slum Residents