बारामतीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

समर्थनगरमधील ज्या भाजीविक्रेत्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या सून व मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.  आता त्याच्या अनुक्रमे एक व आठ वर्षांच्या दोन नातवंडे असलेल्या मुलींनाही कोरोनो पॉजिटिव्ह आला आहे. 

बारामती : शहरातील कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याच्या दोन नातवंडांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समर्थनगरमधील ज्या भाजीविक्रेत्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्या सून व मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.  आता त्याच्या अनुक्रमे एक व आठ वर्षांच्या दोन नातवंडे असलेल्या मुलींनाही कोरोनो पॉजिटिव्ह आला आहे. यामुळे आता प्रशासनाने समर्थनगर परिसरावरच लक्ष केंद्रीत केले असून, ही लहान मुले कोणाच्या संपर्कात आली होती, त्यांच्याशी आणखी काही लहान मुले खेळत होती का, तसेच या भागातील काही मोठ्या व्यक्तींनी या लहान मुलांना खेळवले होते काय? याचा शोध सुरु झाला आहे. 

Coronavirus : स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

बारामतीतील पहिला रुग्ण भिगवण रस्त्यावरील सहयोग सोसायटीसमोरील त्रिमूर्तीनगर येथे रिक्षाचालक सापडला होता. त्यानंतर भाजीविक्रेत्या कुटुंबातील एका ज्येष्ठाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्याच कुटुंबातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका
 

दरम्यान, पोलिसांनी या भागातील बंदोबस्त अधिक कडक केला असून, कोणालाही विनाकारण पोलिस रस्त्यावर येऊ देत नाहीत. या भागातील लोकांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आता अधिक कठोर निर्णय प्रशासन घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बारामतीतील भाजी, फळे, मटण, चिकन व मासळीविक्रीवर या पूर्वीच बंदी आणलेली असून, आता रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही कठोर उपाय होतील, अशी चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two young girls in Baramati infected by Corona virus