पुण्याचे महापौरपद खुल्या गटासाठी; राज्यातील सोडत जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांच्या या महापौरपदाची मुदत 15 सप्टेंबरला संपुष्टात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे या पदासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे पुण्याच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक या पदावर कायम होत्या. परंतू ही मुदतवाढ येत्या 21 नोव्हेंबरला संपणार असल्याने या पदासाठी मुंबईत बुधवारी सोडत झाली

पुणे : पुणे महापालिकेतील महापौरपद आता खुल्या (सर्वसाधारण-ओपन) या घटकासाठी आरक्षित झाले असून, त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी की जुन्या-जाणत्यांची वर्णी लागणार ? याची उत्सुकता आहे. याआधी हे पद खुल्या (महिला)प्रवर्गासाठी आरक्षित होते. 

चर्चा योग्य दिशेने सुरु झाली : उद्धव ठाकरे 

पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांच्या या महापौरपदाची मुदत 15 सप्टेंबरला संपुष्टात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे या पदासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे पुण्याच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक या पदावर कायम होत्या. परंतू ही मुदतवाढ येत्या 21 नोव्हेंबरला संपणार असल्याने या पदासाठी मुंबईत बुधवारी सोडत झाली. त्यात, ‘ओपन’ घटकाकडे हे पद गेले आहे. त्यामुळे नवी राजकीय समीकरणे पाहाता सत्ताधारी भाजप कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौरपदासाठी आज सोडत ​
महापौर सोडत
 • मुंबई- ओपन
 • पुणे - ओपन
 • नागपूर - ओपन
 • ठाणे- ओपन
 • नाशिक - ओपन
 • नवी मुंबई - ओपन महिला
 • पिंपरी चिंचवड - ओपन महिला
 • औरंगाबाद- ओपन महिला
 • कल्याण डोंबिवली - ओपन
 • वसई विरार- अनुसूचित जमाती
 • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 • चंद्रपूर - ओपन महिला
 • अमरावती- बीसीसी
 • पनवेल- ओपन महिला
 • नांदेड-बीसीसी महिला
 • अकोला - ओपन महिला
 • भिवंडी- खुला महिला
 • उल्हासनगर- ओपन
 • अहमदनगर-  अनुसूचित जाती (महिला)
 • परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 • लातूर - बीसीसी सर्वसाधारण
 • सांगली- ओपन
 • सोलापूर-बीसीसी महिला
 • कोल्हापूर-बीसीसी महिला
 • धुळे - बीसीसी सर्वसाधारण
 • मालेगाव - बीसीसी महिला
 • जळगाव खुला महिला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation of open group for pune Mayor Post