जिल्हाअंतर्गत वाहतुकीच्या निर्णयाबाबत पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हणतात पोलिस?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

राज्य सरकारने ३१ जुलैनंतर निर्बंध आणखी शिथिल करण्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे यापुढे जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी पासची गरज लागणार की नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.​

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवासावरील निर्बंध पूर्वीप्रमाणेच यापुढेही कायम राहणार आहेत. तर अत्यावश्यक कारणासाठीच्या आंतरजिल्हा प्रवासासाठी देखील पूर्वीप्रमाणेच पोलिसांची परवानगी आवश्यक असून त्यासाठीची पुणे पोलिसांची 'डिजिटल पास' सेवा सुरूच राहणार आहे, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

२८९२ कोटींच्या कर्जापायी अनिल अंबानींनी गमावले मुख्यालय; येस बँकेने केली कारवाई​

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाता यावे, यासाठी पुणे पोलिसांनी डिजिटल पासची सुविधा उपलब्ध करून दिली होती. लॉकडाऊन जसजसा वाढेल, तसतसे डिजिटल पासची मर्यादा वाढविण्यात येत होती. दरम्यान, संचार मनाई आदेशाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरिकांचे अन्य जिल्ह्यात जाण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, मागील लॉकडाऊननंतर पुन्हा केवळ जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू किंवा वैद्यकीय कारणासाठी पास उपलब्ध होत होता.

Video : पुण्यातील कोरोनास्थितीबाबत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले गाऱ्हाणे; केल्या 'या' मागण्या​

दरम्यान, राज्य सरकारने ३१ जुलैनंतर निर्बंध आणखी शिथिल करण्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे यापुढे जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी पासची गरज लागणार की नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. मात्र, प्रवासासाठी यापूर्वी असलेले नियमांचे बंधन यापुढेही कायम असेल. अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करता येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’नुसार २९ जुलै रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्वीच्या नियमांप्रमाणेच जिल्हाअंतर्गत वाहतूक पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रकारची वाहतूक टाळावी. तसेच अत्यावश्यक कारणासाठी जिल्हाअंतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पाससाठी www.punepolice.in  या वेबसाईटवर अर्ज करावा."
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

डिजीटल पाससाठी इथे करा अर्ज -
www.punepolice.in 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions on travel other than essential services will remain the same as before declared by Pune Police