पुण्यातील तीन जागांवर भाजपला धक्का | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल समोर येत असून, खडकवासला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके तर वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे आघाडीवर आहेत.

पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल समोर येत असून, खडकवासला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके तर वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता बहिरट आघाडीवर आहेत. इतर पाच मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र याठिकाणीही उमेदवारांमध्ये चुरस आहे.

पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत काँटे की टक्कर; काय होणार? | Election Results 2019

पहिल्या फेरीअखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघात आघाडीवर आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे , पर्वती मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, कसबा पेठ मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक, शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर आहेत. 

हडपसर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर हे पहिल्या फेरीअखेर फक्त 196 मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी मोठी चुरस दिसून येत आहे.

सकाळी 9 : भाजपचे शतक, युतीला मोठी आघाडी; काँग्रेस-राष्ट्रवादी मागे

धक्कादायक निकाल म्हणजे वडगावशेरी मतदारसंघात विद्यमान आमदार जगदीश मुळे हे पिछाडीवर असून, या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. तसेच खडकवासला मतदारसंघांमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांनी भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांना पहिला फेरीअखेर मागे खेचले आहे. त्यामुळे पुण्यातील निकाल धक्कादायक लागतील असे एकूण चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: result trends in pune till 10 am for Vidhansabha elections 2019