'क्रेडीट सिस्टीम'च्या त्रुटींमुळे रखडले निकाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदापासून पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांना क्रेडीट सिस्टीम सुरू केल्यानंतर, त्यातील त्रुटींचा फटका पहिल्या सत्राच्या निकालाला बसला आहे. विद्यापीठाला कमाल 45 दिवसात निकाल लावण्याचे बंधन असतानाही दोन महिने होत आले तरी पदविच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर अद्याप जाहीर झालेला नाही.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदापासून पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांना क्रेडीट सिस्टीम सुरू केल्यानंतर, त्यातील त्रुटींचा फटका पहिल्या सत्राच्या निकालाला बसला आहे. विद्यापीठाला कमाल 45 दिवसात निकाल लावण्याचे बंधन असतानाही दोन महिने होत आले तरी पदविच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर अद्याप जाहीर झालेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठामार्फत बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीएससी (कॉम्पीटर), बीसीए, बीबीएम या पदवीच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राची परीक्षा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या. त्यानंतर महाविद्यालयांनी उत्तरपत्रीका तपासून त्यांचे गुण 20 डिसेंबर पर्यंत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाकडे पाठविले होते. काही दिवसांनी विद्यापीठांकडून निकाल अंतीम करून तो जाहीर करण्यासाठी महाविद्यालयांकडे पाठविणे आवश्‍यक होत. मात्र, जानेवारी महिना संपत आला तरी अद्यापही महाविद्यालयांकडे अंतीम गुण पाठविण्यात आलेले नाहीत.

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

यापूर्वी गुणांचे मुल्यांकन महाविद्यालय स्तरावर करून महाविद्यालयाच निकाल लावत होते. यंदापासून पदविच्या प्रथम वर्षासाठी क्रेडीट सिस्टीम लागू झाल्याने हे गुण विद्यापीठाकडे पाठविले गेले. त्यांचे विद्यापीठाकडून मूल्यांकन पूर्ण झाले की ते महाविद्यालयाला पाठवून निकाल जाहीर केले जाणार आहेत. काही अभ्यासक्रमांची परीक्षा 5 नोव्हेंबरला तर काहींची 30 नोव्हेंबरला संपली. परीक्षा होऊन दीड ते अडीच महिने होत आले तरी अद्याप निकाल जाहीर केलेला नाही. विद्यापीठाने क्रेडीट सिस्टीम लागू करण्यासाठी गडबड केल्याने ही उशीर होत आहे, याचा फटका विद्यार्थांना बसणार आहे, असे माजी अधिसभा सदस्य डॉ. अतुल बागुल यांनी सांगितले.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फटका
सर्व शाखांमधून पदविच्या प्रथम वर्षांच्या पहिल्या सत्राची परीक्षा हजारो विद्यार्थींनी दिली आहे. त्यांचे दुसऱ्या सत्राचे वर्गही सुरू झाले आहेत. यात काही विद्यार्थ्यांचे पहिल्या सत्रातील काही विषयात अनुत्तीर्ण झाल्यान त्यांना पुढच्या परीक्षेचा अभ्यास करताना अपुरा वेळ मिळणार आहे. त्याचा फटकाही विद्यार्थांना बसण्याची शक्‍यता आहे.

"कला, विज्ञान, वाणिज्य या शाखेतील निकाल क्रेडीट सिस्टीम नुसार निकाल लावताना त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात बदल करणे आवश्‍यक असल्याने या विषयातील अधिष्ठातांची समिती नेमून या नियमावलीत बदल करण्यात आले. यामुळे निकाल लावण्यास विलंब झाला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये महाविद्यलयांकडे निकाल पाठवून दिला जाईल.'' - डॉ. अरविंद शाळीग्राम, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग

पदवी परीक्षेची शेवटची तारीख
बीसीए 5 नोव्हेंबर
बीएससी (कॉम्प्यूटर) 11 नोव्हेंबर
बीबीए 18 नोव्हेंबर
बीए 25 नोव्हेंबर
बीकॉम 30 नोव्हेंबर
बीएससी 30 नोव्हेंबर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: results Pending due to errors in credit system