पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने केलेल्या कामांचा व ‘अर्थ’संकल्पाचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

स्थापत्यविषयक कामांना प्राधान्य
सार्वजनिक रस्त्यांचा विकास, उड्डाणपूल, नदी-नाल्यांसह लोहमार्गांवर पूल उभारणे, पदपथ, सांडपाणी नलिका टाकणे, समाजमंदिरे, वाचनालये, शाळा, व्यायाम शाळा, व्यापारी संकुले, क्रीडांगणे, जलतरण तलाव उभारणे आदी कामे स्थापत्य विभागात येतात. शहरासह समाविष्ट गावांमध्ये फेरफटका मारल्यानंतर अशी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची एक हाती सत्ता जाऊन २०१७ मध्ये भाजपने महापालिका ताब्यात घेतली. त्यांच्या कार्यकाळात तीन अर्थसंकल्प मांडण्यात आले. सोमवारी (ता. १७) चौथ्या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने केलेल्या कामांचा व ‘अर्थ’संकल्पाचा आढावा घेणारी मालिका आजपासून...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी - भाजपच्या महापालिकेतील तीन वर्षांच्या काळात विविध विकासकामांसाठी केलेल्या तरतुदींपैकी सरासरी ६० टक्केच खर्च झाल्याचे अर्थसंकल्पातील आकडेवारीवरून दिसून येते. सर्वाधिक खर्च स्थापत्यविषयक कामांवर झाला आहे. त्याखालोखाल जलनिस्सारण आणि पाणीपुरवठ्याच्या कामांचा समावेश आहे. 

पुण्यातील 'या' दोन मेट्रो मार्गांचे काम मार्चअखेरपर्यंत होणार

२०१२ ते २०१७ या कालावधीत अवघे तीन नगरसेवक असलेल्या भाजपने २०१७ मध्ये ७७ जागा मिळवत महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. यात पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे नेतृत्व कामी आले. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे कष्टही महत्त्वाचे ठरले. भाजपच्या सत्तेला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीन अर्थसंकल्पांतून भाजपने आपला वेगळा ठसा उमटविला असल्याचे शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसते. मात्र अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींपेक्षा सरासरी ६० टक्केच खर्च झाल्याचेही वास्तव आहे.

पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर

यात २०१७-२८ या वर्षात स्थापत्य, भूसंपादन, शहर आराखडा, विद्युत, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, पर्यावरण आदी विषयांसाठी १२८५ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केलेली होती. त्यातील केवळ ७४२ कोटी तीन लाख रुपये खर्च झाले. हे प्रमाण ५८ टक्के आहे. तर २०१८-१९ साठी १७३२ कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद होती. त्यातील १०८० कोटी ९५ लाख रुपये, अर्थात ६२ टक्के रक्कम खर्च झाली. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प चार हजार ६२० कोटी रुपयांचा होता. त्यातील तरतुदींनुसार व केंद्र सरकारच्या योजनेतील निधीनुसार शहरात विकासकामे सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A review of the work and budget of BJP in Pimpri Chinchwad