esakal | 'रिक्षावाल्या काकां'च्या मुलीला मिळाले शंभर टक्के गुण !
sakal

बोलून बातमी शोधा

Ssc exam

'रिक्षावाल्या काकां'च्या मुलीला मिळाले शंभर टक्के गुण !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नामांकित महाविद्यालयातून इंजिनिअरचे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी जेईईमध्ये (Jee) चांगला स्कोअर करायची इच्छा आहे. आई-बाबांचे स्वप्नं साकार करण्यासाठी खूप शिकायचे आहे. त्यांनी आजपर्यंत केलेली मेहनत वाया जाऊ देणार नाही, असा आत्मविश्वास दहावीच्या परीक्षेत (Ssc Exam) तब्बल १०० टक्के गुण मिळविणाऱ्या वैष्णवी पांडुळे हिने व्यक्त केला. (Rickshaw driver daughter 100 percent marks Ssc Exam)

खराडी (Kharadi) येथील सुंदरबाई मराठे विद्यालयातील वैष्णवी ही शिक्षण घेते. तिचे वडील बबन पांडुळे हे गेल्या बारा वर्षांपासून पुण्यातील (Pune) खराडी (Kharadi) परिसरात रिक्षा चालवत आहेत. बिकट परिस्थितीमुळे आपल्याला उच्च शिक्षण घेता न आल्याची खंत त्यांना आहे. मात्र, आपल्या पोरांनी चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. वैष्णवीने दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल पांडुळे भरभरून बोलत होते.

हेही वाचा: पवार-मोदी भेटीबाबात संभ्रम नको; नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण

ते म्हणाले, ‘‘एका रिक्षावाले काकाच्या मुलीने १०० टक्के गुण मिळविल्याचा अभिमान आहे. मला दोन मुली, एक मुलगा आहे. मोठी मुलगी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. दुसरी मुलगी म्हणजे वैष्णवी आणि लहान मुलगा नववीत आहे. परंतु मी माझ्या सगळ्या मुलांना खूप शिकवणार आहे. वैष्णवीने आमच्या घराचे नाव मोठे केले.’’

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी, कोरोना नियम पायदळी

loading image