रिक्षाचालकाच्या मुलीचे आयआयटीचे स्वप्न साकार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैष्णवी

रिक्षाचालकाच्या मुलीचे आयआयटीचे स्वप्न साकार!

पुणे : रिक्षाचालक बबन मारुती पांडुळे यांची मुलगी वैष्णवी हीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून अव्वलस्थान पटकावले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) शिक्षण घेण्याची तिची इच्छा आहे. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

हेही वाचा: Pune : मंगळवारी लसीकरण केंद्रावर कोव्हीशील्डचे २५० डोस

‘एलन’च्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वैष्णवीला भविष्यात जेईई ॲडव्हान्सची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन, आयआयटीमध्ये संगणक विज्ञान शाखेत बी.टेक.चे शिक्षण घ्यायचे आहे. सुरेंद्र फाउंडेशनच्या माध्यमातून वैष्णवीचा संपर्क एलनच्या पुणे केंद्राशी झाला. त्यानंतर तिला ९० टक्केपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय ‘एलन’तर्फे घेण्यात आल्याची माहिती केंद्र प्रमुख अरुण जैन यांनी सांगितली.

हेही वाचा: डिझेलचे दर वाढल्यामुळे ऊस वाहतुकीच्या दरातही वाढ करा

कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण

कोरोनामुळे ज्या कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावली असेल, अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ‘एलन’ने पुढाकार घेतला आहे. एलन करिअर इन्स्टिट्यूटद्वारे त्यांचे शिक्षण मोफत करण्यात आले आहे. अशा १४० विद्यार्थ्यांना एलनमध्ये प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती संचालक नविन माहेश्वरी यांनी दिली.

Web Title: Rickshaw Drivers Daughters Dream Of Iit Comes True

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsIIT