esakal | शेंगदाण्याच्या भावात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Groundnut

शेंगदाण्याच्या भावात वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : बाजारात विविध ठिकाणांहून होणारी शेंगदाण्याची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात शेंगदाण्याच्या भावात दर्जानुसार क्विंटलमागे ८०० ते १२०० रुपयांची वाढ झाली.

हेही वाचा: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

गणेशोत्सवापर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यापारी अशोक लाढा यांनी व्यक्त केली. दरवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत इतर राज्यांतील शेंगदाण्याचा हंगाम संपत असतो. त्यामुळे सुमारे एक ते दीड महिना त्याचा तुटवडा जाणवतो. या वेळी श्रावणातील उपवासामुळे शेंगदाण्याला मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत असून भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात घुंगरू शेंगदाण्याचा किलोचा भाव १०२ ते १०५, तर स्पॅनिश शेंगदाण्याचा भाव ११० ते ११२ रुपये असल्याचे लोढा यांनी सांगितले.

हेही वाचा: बजाजच्या लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार

शेंगदाण्याचा हंगाम संपला आहे. त्यामुळे परराज्यातून होणारी आवक थांबली आहे. मार्केटयार्डातील भुसार विभागात आंध्र प्रदेश, कर्नाटकातून शेंगदाण्याची आवक होते. तसेच मध्य प्रदेश आणि बिहारमधूनही आवक होते. मात्र, बिहार आणि मध्य प्रदेशातील आवक थांबली आहे. तर गुजरातमधील मालही संपला आहे. त्यामुळे बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शेंगदाण्याचे भाव -

(क्विंटलचे)

  • २५ ऑगस्ट : ८८०० ते ९००० रुपये

  • ४ सप्टेंबर : १०००० ते १०५०० रुपये

loading image
go to top