
सोयाबीनचे तेल अर्जेंटिना या देशातून आयात केले जाते. तेथील कामगार संघटनांनी बंद पुकारल्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.
शिवाजीनगर (पुणे) : अनलॉकनंतर मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे. भारतामध्ये जवळपास ७० ते ८० टक्के तेल आयात केले जाते. यामध्ये सुर्यफूलाचे तेल युक्रेन, रशिया या देशांमधून आयात केले जाते. मात्र, या वर्षी युक्रेनमध्ये पीक खराब झाल्याने आणि रशियामध्ये सुर्यफूलाच्या पिकाची कमतरता आणि निर्यात दर वाढल्याचा फटका तेलाच्या भाववाढीवर झाला.
सोयाबीनचे तेल अर्जेंटिना या देशातून आयात केले जाते. तेथील कामगार संघटनांनी बंद पुकारल्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. पाम तेलाची आयात मलेशिया देशातून केली जाते. सुर्यफूल आणि सोयाबीन या दोन्ही तेलाचे भाव वाढल्याने पाम तेलाचे भाव वाढवण्यात आले. या अगोदर एवढी प्रचंड प्रमाणात भाववाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दिवसेंदिवस तेलाच्या किमती वाढत चालल्याने सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे.
- उर्दू प्रेमींसाठी आनंदाची बातमी; पुणे विद्यापीठानं सुरू केला डिप्लोमा कोर्स!
"घरातील बहुतांशी पदार्थ बनवण्यासाठी तेल वापरावे लागते. तेलाचे दर दिवसेंदिवस वाढतायत. गृहिणी महिन्याला तेलासाठी एक रक्कम वेगळी काढून ठेवत असतात, आता त्यामध्ये वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी भाववाढ चिंतेची बाब आहे."
- सीमा (खत्री) जोशी, गृहिणी, गुजरात कॉलनी, कोथरूड.
"तेलाचे भाव वाढल्यामुळे मागणी कमी झाली आहे. गुंतवणूकीचे प्रमाण वाढले आणि तेजीनंतर मंदी झाल्यास व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे."
- खुशाल उणेचा, तेलाचे व्यापारी मार्केट यार्ड.
"आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही महिन्यात तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. परंतु मागील आठ दिवसांपासून तेलाचं स्थिर झाले आहेत".
- रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी, मार्केट यार्ड.
- Breaking: काँक्रिट मशिनचा धक्का लागल्याने पुण्यात तरुणाचा जागीच मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना
वर्षभरात झालेली भाववाढ
तेल प्रकार | दर (जानेवारी २०२०) | दर (जानेवारी २०२१) |
सुर्यफूल | १४२० ते १४८०, १५ लि. | १९८० ते २०४०, १५ लि. |
सोयाबीन | १४२० ते १५००, १५ किलो | १९२० ते २०००, १५कि |
पाम | १३८० ते १४३०, १५ किलो | १७८० ते १८२०, १५ किलो |
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)